Take a fresh look at your lifestyle.

आणि फडणवीसांच्या भाजपला बसला झटका; पहा कोणता डाव टाकलाय महाविकास आघाडीने

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत काही आमदारांना गुप्तपणे मतदान करायला लावून महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप असल्याच्या बातम्या येत असतानाच आता वेगळी बातमी आली आहे. ज्यामुळे भाजपला मोठा झटका बसणार आहे.

Advertisement

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दिव्य मराठी’ला माहिती देताना म्हटले आहे की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान टाळता यावे आणि राज्यपालांच्या परवानगीची गरज भासू नये. यासाठी ही निवड आवाजी मतदानाने करता यावी म्हणून कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला आहे. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी लागते. कारण ही निवड गुप्त मतदान करून केली जाते. केवळ महाराष्ट्रातच ही तरतूद आहे. म्हणून कायद्यात दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आमदारांची उपस्थिती लक्षात घेऊन शक्यतो येत्या अधिवेशनातच ही दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड होेईल. या निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी कोण उमेदवार असेल ते जाहीर करतील, असेच पटोले यांनी स्पष्ट केलेले आहे. मात्र, उमेदवार कोण असेल याकडे त्यांनी अजिबात निर्देश केलेले नाहीत.

Advertisement

अर्र.. फ़क़्त पत्रकार-विरोधी नेतेच नाही.. तर CBI प्रमुख व अंबानींचे नावही आहे ‘पेगासस’च्या यादीत..!

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply