Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल’ची सर्वात जूनी सेवा होणार बंद, तुमचा डाटा असल्यास आताच काढून घ्या.. नाहीतर फटका बसण्याची शक्यता..

मुंबई : गुगल युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गुगलने (Google) आपले एक जूने फीचर लवकरच बंद करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणजे, गुगल बुकमार्क्स (Google Bookmarks). मागील १६ वर्षांपासून सुरु असलेले हे फिचर येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून बंद  केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘गुगल बुकमार्क्स’च्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना दिली आहे.

Advertisement

Google Bookmarks ही 16 वर्षे जुनी आणि फारशी लोकप्रिय नसलेली सुविधा सर्व युजर्ससाठी बंद केली जाणार आहे.

Advertisement

बुकमार्क्ससवरील सर्व डेटा गुगलने युजर्सला ‘एक्सपोर्ट’ (Export) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जात Export Bookmarks वर क्लिक करावं. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी करु शकणार आहे. ही सुविधा बंद होणार असल्याने त्याचा परिणाम गुगल मॅप्सवरही (Google Maps) होण्याची शक्यता आहे.

Advertisement

गुगल बुकमार्क्स बंद झाल्यावर गुगल मॅप्सवरील काही फीचर्सबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण हे फीचर बुकमार्क्सशी संबंधित आणि सिंक केलेले आहे.

Advertisement

गुगल मॅप्सवर युजर्स आपल्या आवडत्या ठिकाणांचा डेटा एका लिस्टमध्ये एकत्रित ठेवू शकतो आणि नंतर तो पडताळू शकतो. एखाद्या वेबसाईटवर ‘गुगल मॅप्स’वर ‘एम्बेडेड मॅप्स’ (Embedded Maps) असेल, तर युजर तो गुगल मॅप्सवर सेव्ह करु शकतो.

Advertisement

तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी वेबसाईटवर क्लिक करुन मॅपवरील ठिकाणावर क्लिक करावे. त्यानंतर ‘सेव्ह’ क्लिक करुन लिस्ट निवडावी. तुम्हाला स्टार आणि वेबसाइटचे नाव तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाईलवर दिसू लागेल.

Advertisement

गुगल मीटवर मीटिंगसाठी आता पैसे लागणार, फ्रि अनलिमिटेड ग्रुप काॅलिंग सेवा बंद, पाहा किती पैसे लागणार..?
पुरुषगुगलवर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply