Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अखेर गुगलला बंद करावे लागतेय ‘तेही’ उत्पादन; पहा कोणाला होणार याचा तोटा..!

पुणे : गुगलच्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. गुगल कंपनीने आपले एक जुने फीचर लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फीचर आहे ‘गुगल बुकमार्क्स.’ मागील 16 वर्षांपासून सुरू असलेले हे फीचर येत्या 30 सप्टेंबर 2021 पासून बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना देण्यात आली आहे.

Advertisement

गुगल बुकमार्क्स हे फीचर फारसे लोकप्रिय नव्हते. अनेक युजर्सना तर याबाबत माहिती सुद्धा नव्हते. त्यामुळे कंपनीनेही याचा विचार करत अखेर हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुकमार्क्सवरील सर्व डेटा गुगलने युजर्सना एक्सपोर्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी युजर्सने google.com/bookmarks येथे Export Bookmarks वर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्त्यांना आपला डेटा कॉपी करता येईल. ही सुविधा आता बंद होणार असल्याने त्याचा परिणाम ‘गुगल मॅप्स’ वर सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

गुगल हे आपल्या वापरातील महत्वाचे सर्च इंजिन आहे. आज जगभरातील अब्जावधी लोक गुगलचा वापर करतात. त्यामुळे कंपनी सुद्धा सातत्याने नवीन फीचर आणत असते. तसेच जुने आणि फारसे वापरात नसलेले फीचर बंद केले जातात. या क्रमात बुकमार्क्सचा नंबर आला आहे. कंपनी हे फीचर लवकरच बंद करणार आहे. याची माहिती कंपनीने युजर्सना दिली आहे. हे फीचर बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम गुगल मॅप्सवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, हे फीचर बुकमार्क्सशी संबंधित आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी गुगलने ‘पेस्ड वॉकिंग’ हे नवीन फिचर बाजारात आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलाबद्दल योग्य आणि सविस्तर माहिती देणार आहे. यामध्ये ऑडिओ बिट्सचा वापर करुन युजरची पावले ट्रॅक करता येतात. ‘गुगल फीट’ आणि ‘अँड्रॉइड’ फोनमध्ये कंपनी हे फीचर उपलब्ध करुन देणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली होती. स्मार्ट वॉच किंवा फोन मधील अॅपच्या मदतीने किती तुम्ही किती पावले चाललात याची माहिती तर मिळतेच. मात्र, या नवीन फीचरमध्ये चालण्याचा वेग मोजता येणार आहे. तसेच एका मिनीटाला शंभर पेक्षा जास्त पावले चाललात तर हार्ट पॉईंट सुद्धा मिळणार आहे.

Advertisement

पाकिस्तानवर कोसळले भयंकर संकट; पहा काय केविलवाणी परिस्थिती झालीय देशाची

Advertisement

पेट्राल-डिझेलवरील करांतून मोदी सरकारची छप्परतोड कमाई.. गेल्या आर्थिक वर्षात किती कमावलेय, तुम्हीच पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply