Take a fresh look at your lifestyle.

म्हणून CBI प्रमुखांचे नावही पेगाससच्या यादीत? पहा नेमके काय आहे हेरगिरीचे प्रकरण

दिल्ली : फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित न ठेवता थेट वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मंडळींना लक्ष्य करण्याचा खेळ झाल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबतचा राजकीय आणि एकूणच प्रशासकीय गोंधळ वाढला आहे.

Advertisement

स्पायवेअरचा वापर पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यासाठी करण्यात आल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी इस्रायलमध्ये आयोग स्थापण्यात आला असतानाच भारतातील जबाबदार लोकप्रतिनिधी, सरकारी पदाधिकारी आणि भाजपच्या राजकीय पुढाऱ्यांनी असे काहीही झालेच नसल्याची भलामण करणे सुरू केले आहे. त्यामुळे किमान चौकशी होण्यास काय हरकत आहे असाच सूर विरोधी पक्ष आणि जबाबदार माध्यम समूहांनी आळवला आहे. त्याची आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कितपत दखल घेतात याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा आणि सरकारमधील मंत्र्यांचे मोबाइल नंबर पेगाससच्या यादीत आल्यानंतर सायबर सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली असल्याच्या बातम्या आहेत. अशावेळी ‘फॉरबिडन स्टोरीज’नुसार भारताचे माजी सीबीआय प्रमुख आलोक वर्माही हेरगिरीचे टार्गेट असल्याचे म्हटलेले आहे. वर्मांव्यतिरिक्त त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाच्या खासगी नंबरचाही समावेश पाळत ठेवण्याच्या यादीत आहे. वर्मांचा एक नंबर टाकल्यानंतर एक तासानेच सीबीआयचे दोन इतर वरिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना आणि ए. के. शर्मांचे नंबरही यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

२०१९ मध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वर्मांच्या निवृत्तीबरोबरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर पाळत यादीतून बाहेर काढण्यात आले. वर्मांना हटवले जाण्याच्या तीन आठवडे आधी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी त्यांची भेट घेऊन वर्मांना राफेल कराराशी संबंधित एक फाइल देत चौकशीची मागणी केली होती. र्मा राफेल प्रकरणाची चौकशी सुरू अशीच चर्चा होती. वर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ८ फोन नंबर पेगाससच्या देखरेख टार्गेटच्या यादीत टाकण्यात आले होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने त्याला दुजोरा दिला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply