Take a fresh look at your lifestyle.

पेगासस स्पायवेअरवाल्यांना झटका; इस्त्राईलने घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय

दिल्ली : भारतासह जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या इस्त्रायली पेगासस स्पायवेअर प्रकरणात रोज खळबळजनक खुलासे होत आहे. या प्रकरणी विरोधकांनी संसदेच्या आधिवेशनात जोरदार गोंधळ घातला. या प्रकरणाचे भारतीय राजकारणात जोरदार पडसाद उमटत असतानाच आता इस्त्रायल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इस्त्रायलमधील एनएसओ ग्रुपने हे स्पायवेअर तयार केले आहे. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टास्क फोर्स नियुक्त केला आहे.

Advertisement

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीसाठी इस्त्रायल सरकारने वरिष्ठ मंत्र्यांची एक समिती नियुक्त केली आहे. एनएसओवर होत असलेल्या आरोपांची चौकशी करणे, देशाच्या सायबर तंत्रज्ञान निर्यात धोरणाबाबत समीक्षा करणे, अशी जबाबदारी या समितीस असणार आहे. या स्पायवेअरचा दुरुपयोग होत असल्याचे खात्रीशीर पुरावे दिल्यास चौकशी करण्याची घोषणा या स्पायवेअरची निर्मिती करणाऱ्या एनएसओ या कंपनीने सुद्धा केली आहे. आवश्यकता वाटल्यास सिस्टीम बंद करण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. कुणाते नाव यादीत आहे म्हणजे ते पेगॅससचे टार्गेट आहे, हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणी देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. संसदेच्या पावसाळी आधिवेशनात विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. जवळपास तीनशे भारतीयांची हेरगिरी केल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. या आरोपांना आता भाजपनेही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्द्यावर काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. उपाध्ये यांनी याबाबत ट्विट केले होते. 9 हजार फोन आणि 500 इमेल खाती यांवर काँग्रेसचे नेतृत्व असलेल्या UPA मध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयावर नजर ठेवण्यात आली. ज्यांनी कायम यंत्रणांचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. याआधी या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकावर टीका केली होती. तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहित आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार तसेच अन्य नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला गेला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply