Take a fresh look at your lifestyle.

ड्रॅगन खवळला; पाकिस्तानलाही बसलाय झटका, पहा नेमके काय झालेय दक्षिण आशियामध्ये

दिल्ली : दहशतवादास खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता हा दहशतवादाचा भस्मासूर त्रास देऊ लागला आहे. या देशात काही दिवसांपूर्वी एका बसवर हमला झाला होता. या दुर्घटनेत चीनच्या 9 अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने ड्रॅगन चांगलाच खवळला आहे. चीनने तडकाफडकी निर्णय घेत अब्जावधी डॉलर्स खर्चाच्या जलविद्यूत योजनेचे कामकाज रोखले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर योजनेच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या संयुक्त समन्वय समितीची बैठकही रद्द केली आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मात्र जोरदार झटका बसला आहे.

Advertisement

दासू जलविद्यूत योजनेचे काम सुरू असतानाच हा हमला झाला होता. या घटनेत चीनचे 9 इंजिनिअर तसेच 13 अन्य लोकांचा मृत्यू झाला होता. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली, असे वक्तव्य पाकिस्तान विदेश कार्यालयाने दिले होते. मात्र, चीनने या वक्तव्यावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या विस्फोट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना येथे विस्फोटकांचे काही पुरावे मिळाले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चीनने 15 सदस्यीय पाकिस्तानात पाठवले होते. म्हणजेच, चीनला पाकिस्तानवर आजिबात विश्वास नसल्याचेच याद्वारे सिद्ध होत आहे.

Advertisement

दरम्यान, पाकिस्तानने चीनकडून अब्जावधींचे कर्ज घेतले आहे. सीपीईसी प्रकल्पासाठी सुद्धा चीनने पाकिस्तानला मोठे कर्ज दिले आहे. हे कर्ज परत करण्याची ताकद या देशात नाही. त्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते चीनचा विरोध करू शकत नाही. याचाच फायदा घेत येथे चीनने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे. आता तर चीनलाही या प्रकल्पाचा त्रास होत आहे. एकतर प्रकल्पातील अनेक कामे आजही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे चीनच्या नागरिकांवर हमले सुद्धा होत आहेत, त्यामुळे पाकिस्तानात त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता चीनसाठीच मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे. पण, या प्रकल्पात अशा अडचणी येत असल्याने प्रकल्पाचे नियोजित कामकाज कसे पूर्ण करायचे असा प्रश्न आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply