Take a fresh look at your lifestyle.

‘तशा’ पद्धतीने कॅट देणार आहे चीनला झटका; पहा भारतीयांचा नेमका काय आहे प्लान

मुंबई : चीन आणि भारतात सध्या तणावाचे वातावरण असले तरी या दोन्ही देशांतील व्यापार मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात आता भारतातील व्यापाऱ्यांनी पुन्हा चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे नियोजन करत आहेत. चायनीज वस्तूंवरील बहिष्कार मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) ही मोहिम सुरू केली आहे.

Advertisement

डिसेंबर 2021 पर्यंत चीनच्या वस्तूंची भारतातील आयात एक लाख कोटींनी कमी करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. एफएमसीजी उत्पादने, दैनंदीन वस्तू, किराणा, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, क्रॉकरी, गिफ्ट, फर्निचर या काही वस्तू चीनमधून येत आहेत, यावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची योजना तयार करण्यात येत असल्याचे कॅटचे सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले.

Advertisement

या मोहिमेत देशभरातून साधारण 8 कोटी व्यापारी सहभागी होतील, असा अंदाज आहे. देशात 2001 मध्ये चीनी वस्तूंची आयात फक्त 2 अब्ज डॉलर्स होती. आता मात्र यामध्ये मोठी वाढ झाली असून 2021 मध्ये 70 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही देशात तणाव सातत्याने वाढत आहे, चीनने कुरापती काढण्याचे आपले उद्योग अजूनही थांबवलेले नाहीत. तरीसुद्धा व्यापाराचा विचार केला तर आजही चीन हाच भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

या वर्षात एप्रिलमध्ये चीनमधून जवळपास 65.1 लाख डॉलर्सच्या विविध वस्तू आयात करण्यात आल्या. मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा आकडा दुपटीने जास्त आहे. लॉकडाऊन काळात व्यापार जवळपास बंदच होता. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्यानंतर निर्बंध कमी झाले तसा व्यापार आधी पेक्षा जास्त वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षात विविध प्रकारच्या इलेक्ट्ऱॉनिक वस्तू, कॉम्प्यूटर हार्डवेअर आणि दूरसंचार उपकरणांच्या आयातीत वाढ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

2021 मध्ये चीनी आयातीची हिस्सेदारी 40.5 टक्के आहे. 2020 मध्ये 37.2 टक्के होती. 2019 मध्ये 36.9 टक्के होती. 2021 मध्ये एकूण निर्यातीत चीनचा वाटा 16.53 टक्के राहिला आहे. मागील 12 वर्षात सर्वाधिक आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply