Take a fresh look at your lifestyle.

‘ते’ विषय शिकायची विद्यार्थ्यांची रुची वाढलीय; पहा नेमके काय म्हटलेय संशोधन अहवालात

मुंबई : भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलिकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्रसारखे विषय शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने ई- लर्निंगच्या प्रवाहांचे परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

Advertisement

१,९६३ विद्यार्थी सामील असलेल्या सर्वेक्षणातील ४२% विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजीसह त्यांना हव्या असलेल्या विषयांसाठी चांगले स्रोत उपलब्ध आहेत. मात्र उलटपक्षी, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना (५८%) वाटते की, त्यांच्या आवडीच्या अपारंपरिक विषयांत मदतीसाठी योग्य स्रोत उपलब्ध नाहीत. यात संस्कृत (१२%), मानसशास्त्र (१०%), राज्यशास्त्र (९%), तत्त्वज्ञान (६%) आणि इतर (२०%) आदींचा समावेश आहे.

Advertisement

या परिणामांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि सर्वसमावेशक ऑनलाइन स्रोतांची उपलब्धता यांतील फरक अधोरेखित झाला. नवोदित एडटेक कंपन्यांनी ही कमकुवत बाजू ओळखली पाहिजे. तसेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडे ऑनलाइन शैक्षणिक स्रोत वाढवून या गटातील ग्राहकांच्या गरजा पुरवल्या पाहिजेत.

Advertisement

या सर्वेक्षणात, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून शिकताना कोणत्या विषयाचा सर्वाधिक आनंद घेतला, हे शोधण्यात आले. तेव्हा गणित, विज्ञान आणि भाषा (इंग्रजी किंवा इतर) या विषयांना समान २३% मते दिली गेली. त्यानंतर समाजशास्त्र आणि कंप्यूटर/तंत्रज्ञान इत्यादींचा क्रमांक लागतो. त्यांनाही दूरस्थ शिकणाऱ्यांनी प्रत्येकी ११% मते दिली आहेत. घरी राहून शिकताना बहुतांश रिमोट लर्नर्सनी (३३%) गणितासाठी सर्वाधिक मदत लागल्याचे सांगितले. त्यानंतर विज्ञान (२३%), इंग्रजी (१७%), सोशल सायन्स (१३%) आणि कंप्यूटर/ तंत्रज्ञान (९%) यांचा क्रमांक लागतो.

Advertisement

कठीण विषयाचा अभ्यास करताना कोणत्या स्रोताची सर्वाधिक मदत झाली हे विचारले असता, एक तृतीयांश (३३%) सहभागींनी अभ्यासात मदत करणाऱ्यांमध्ये ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मला पसंती दिली. उर्वरीत विद्यार्थ्यांनी (३२%) पुस्तके आणि सर्च इंजिन्स (३०%) या पर्यायांकडून अभ्यास करताना पूरक मदत घेतल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, सर्वेक्षणात दिसून आले की, ५% विद्यार्थ्यांनी शिकतानाच होम ट्युशन्स, कोचिंग क्लासेस किंवा सेल्फ स्टडी आदींची मदत घेतली.

Advertisement

या निरीक्षणांद्वारे, भारतातील के-१२ क्षेत्र कोणत्या महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जावे लागत आहे, हे अधोरेखित करते. अधिक गतिशील, समाज-आधारीत उपाय, जे विद्यार्थ्यांना कधीही, कुठेही उपलब्ध होतात या पर्यायांमुळे शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींना कालबाह्य ठरवले जात आहे.

Advertisement

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणतात, “आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे शाळेपुरतेच मर्यादित नाही. महामारीने विद्यार्थ्यांना वर्गात येण्यापासून रोखलेले असले तरीही भारतातील तरुण वर्ग आशावाद आणि कुतुहल आधारीत निर्धाराने त्यांच्या शिक्षण प्रवासात ऑनलाइन स्रोतांवर अवलंबून राहत आहेत. ऑनलाइन लर्निंग साधने विद्यार्थ्यांना मदत करत आहेत, हे सर्वेक्षणातून दिसलेच, मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडील विषयांसाठी विश्वसनीय ऑनलाइन सामग्रीची उपलब्धता कमी असल्याचे दिसून आले. तरुण विद्यार्थ्यांना मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व तसेच समकालीन प्रादेशिक भाषा उदा. संस्कृत आणि मराठी आदी विषय शिकण्याचीही उत्सुकता आहे.”

Advertisement

म्हणून अखेर गुगलला बंद करावे लागतेय ‘तेही’ उत्पादन; पहा कोणाला होणार याचा तोटा..!

Advertisement

BLOG : पहा ‘पेगासस’च्या मुद्द्यावर रविशकुमार यांनी नेमके काय म्हटलेय; खूपच गंभीर आहे प्रकरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply