Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्यावेळी’ राफेलशी निगडीत नंबर होते हेरगिरीच्या यादीत; पहा कोणावर ठेवलेय गेलेय लक्ष..!

मुंबई : इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत अनेक धक्कादायक बातम्या जगभरातील प्रमुख माध्यम समूहांनी दिलेल्या आहेत. १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या हवाल्याने म्हटले आहे की, राफेल कराराशी संबंधित सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीशी संबंधित लाेकांचे नंबरही पेगाससच्या यादीत टाकण्यात आलेले होते.

Advertisement

राफेल करारात कसे एका विशेष कंपनीला भागीदार निवडण्यात आले हे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितले तेंव्हा अंबानी यांच्या कंपनीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन चीफ जेसुदासन आणि त्यांच्या पत्नीचे नंबरही पाळतीच्या यादीत दिसतात. अंबानींचा नंबर फक्त राफेल करारापर्यंतच सीमित नसल्याचे अनेकांना वाटत आहे. डॅसो एव्हिएशनचे भारतात प्रतिनिधी राहिलेले वेंकट राव पोसिना, साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजित सियाल आणि बोइंग इंडियाचे प्रमुख प्रत्युषकुमार यांचे नंबरही यांच्यासह एनर्जी ईडीएफ या फ्रान्सच्या कंपनीचे प्रमुख हरमनजित नेगींचा नंबरही डेटाबेसमध्ये असल्याने एकूणच हा डाव किती मोठा असू शकतो याची व्याप्ती स्पष्ट झालेली आहे.

Advertisement

फ्रांसने त्यामुळेच या प्रकारची चौकशी सुरू केली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी राफेल वादाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. दरम्यानच्या काळात अनेक संरक्षण क्षेत्राशी निगडीत मंडळींवर लक्ष ठेवण्यात आल्याचे माध्यमांनी म्हटलेले आहे. त्यावर या ‘देशद्रोही’ उद्देशाने बातम्या असल्याची भलामण करून भाजप आणि केंद्र सरकारने अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळेच यातील संशय वाढत आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply