Take a fresh look at your lifestyle.

‘काष्टी’मध्ये रुपड्याचाही भ्रष्टाचार नाही; पाचपुते यांनी केलाय दावा

अहमदनगर : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांच्यासह त्यांच्या सहकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भगवानराव पाचपुते यांच्या कारभारासह संस्थेच्या अनियमिततेवर बोट ठेवले होते. त्याला आता भगवानराव पाचपुते यांनीही पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेत एकही रुपयांचा भ्रष्टाचार झालेला नसून येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधक संस्थेवर चिखलफेक करत असल्याचा दावा भगवानराव पाचपुते यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अॅड. विठ्ठलराव काकडे हे जातील तिथे, लाभ उठवून ज्यांच्याकडे जातील त्यांचे गुरू होतात. चेअरमन असताना पदाचा गैरवापर करून काकडेंनी दुप्पट जमिनीवर कर्ज उचलतानाच पाच लाख रुपयांचा उधार माल नेऊन ती रक्कम नाकारली होती.

Advertisement

आशिया खंडात नावारुपाला आलेली ही संस्था असून जिल्ह्यासह राज्यातील नेत्याच्या सहकारी संस्था असतानाही ही संस्था मोठी केली आहे. नियमबाह्य कर्ज यापूर्वी वसुली केली. १०० टक्के वसुली झालेली आहे. ४० वर्षांच्या काळात एकही भ्रष्टाचार प्रकरण नाही. मात्र विरोधकानी तक्रार केली, यावर चौकशीसाठी केवळ राजकीय दबाव आणून करत आहेत. संस्थेला दोनदा राष्ट्रीय पारितोषिक याकडेही सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक भगनवाराव पाचपुते यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply