Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरवाढीला ब्रेक..! चांदीची चमकही उतरली.. पाहा सराफ बाजारातील आजची परिस्थिती..!

मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत वाढत असणाऱ्या सोन्याच्या दराला आज काहीसा ब्रेक लागला.  सोन्याच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ‘एमसीएक्स’ (MCX) वर सायंकाळी साडे पाच वाजता सोन्याच्या दरात 211 रुपयांची घट नोंदविण्यात आली.

Advertisement

दरम्यान, बाजार बंद होतानाही सोन्याच्या दरातील घसरण कायम राहिली. सोन्याच्या दरात एकून 211 रुपये घसरणीची नोंद झाली. त्यामुळे गुंतवणुकदारांसाठी सोनेखरेदीची मोठी संधी आहे.

Advertisement

‘एमसीएक्स’वर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे दिसले. सायंकाळी साडेपाच वाजता ४२५ रुपयांनी दर कोसळून ६६,७१२ रुपये प्रति किलोवर बाजार बंद झाला. सकाळी बाजार सुरु होतानाही चांदीच्या दरात ८२ रुपयांची घट नोंदविण्यात आली होती.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. सध्या सोन्याचा दर ४७ हजार रुपयांच्या खाली आलेला असला, तरी आगामी काळात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत सोन्याचा दर ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वर्तविण्यात आल्याने सराफ बाजारावर सध्या अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. सध्याचा सोन्याचा दर दोन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आहे. मात्र, आता त्यात वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement

कोरोना काळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याला मोठी पसंती मिळाली. मात्र, सोन्याच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काहीसा फटका बसल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल व मे महिन्यांत ७.९१ कोटी डाॅलर्स किंमतीच्या सोन्याची आयात करण्यात आली.

Advertisement

परिणामी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू खात्यात मोठी तूट नोंदविण्यात आली. चालू खात्यातील तुटीचा हा आकडा २१.३८ अब्ज डाॅलर्स असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

वाव.. आणि सापडली भन्नाट सोनेरी कलरफुल फिश; मोठाच पापलेटसारखा आहे आकार..!
‘भास्कर’वरील छाप्यामुळे पेटलाय देश; संसद ठप्प, पहा कोणत्या नेत्याने काय म्हटलेय ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply