Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स-निप्टीची उसळी.. भांडवली बाजारातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : बकरी ईदच्या सुट्टीनिमित्त काल (बुधवारी) भांडवली बाजार बंद होता. त्याआधी तीन दिवस शेअर बाजारात सातत्याने घसरण होत होती. मात्र, जागतिक बाजारातील तेजीचे सकारात्मक पडसाद भारतीय बाजारातही आज पाहायला मिळाले. 21 जुलैला अमेरिकन शेअर बाजारातील ‘डाऊ जोन्स’ निर्देशांक 0.83 टक्के, तर S&P 500 0.82 टक्क्यांनी वधारला. आशियाई बाजारांमध्येही तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.

Advertisement

आज (गुरुवारी) सकाळी बाजार उघडताच, सेन्सेक्सने 296 अंकांनी उसळी घेत 52,494 ची पातळी गाठली. नंतर सेन्सेक्स 52604 च्या पातळीपर्यंत गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 104 अंकांनी वधारत 15,736 च्या पातळीवर पोहोचला होता.

Advertisement

बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांचे भाव आज वधारल्याचे पाहायला मिळाले. एशियन पेंटस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक्नॉलॉजी या समभागांच्या किंमतीत मात्र घसरण झाली.

Advertisement

भारतीय व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी चिनी मालावर बहिष्कार मोहीम सुरु केली होती. त्याचा दुसरा टप्पा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केलीय. त्यात डिसेंबर 2021 पर्यंत चिनी उत्पादित वस्तूंची आयात भारतात एक लाख कोटी रुपयांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवलेय.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकल आणि व्होकल, स्वावलंबी भारत हाक यशस्वी करण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, या टप्प्यात एफएमसीजी उत्पादने, दैनंदिन वस्तू, किराणा, पादत्राणे, खेळणी, स्वयंपाकघर उपकरणे, क्रोकरी, गिफ्ट वस्तू, फर्निचर फॅब्रिक्स या चीनमधून आयात केल्या जाणार्‍या वस्तूंवर पूर्णतः बहिष्कार घालण्यात यावा.

Advertisement

2001 मध्ये चिनी वस्तूंची भारतातील आयात फक्त 2 अब्ज डॉलर्स होती. ती आता वाढून 70 अब्ज डॉलर्स झालीय. म्हणजेच केवळ 20 वर्षांत चीनकडून आयात केलेल्या वस्तूंमध्ये 3500 टक्के वाढ झालीय.

Advertisement

विचारविनिमय योजनेअंतर्गत चीन भारताचा किरकोळ बाजार हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यास भारतातील व्यापारी आणि नागरिक कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ देणार नाहीत, असे ‘सीएआयटी’चे म्हणणे आहे.

Advertisement

पतंजलीच्या आयपीओची गुंतवणुकदारांना प्रतीक्षा..! पाहा बाबा रामदेव काय म्हणतात..?
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण..! गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी, सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply