Take a fresh look at your lifestyle.

‘भास्कर’वरील छाप्यामुळे पेटलाय देश; संसद ठप्प, पहा कोणत्या नेत्याने काय म्हटलेय ते

पुणे : करोना कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारचे वास्तव जगजाहीर करणाऱ्या अनेक वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यामुळे दैनिक भास्कर हा देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह केंद्र सरकारच्या रडारवर होता. त्याचा डीबी कॉर्पच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाल्यावर अवघा देश पेटून उठला आहे. अनेकांनी या कारवाईला राजकीय असल्याचे म्हटलेले आहे. संसदेत कामकाज यामुळे ठप्प झालेले आहे.

Advertisement
Advertisement

पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून दैनिक भास्कर समूहावर पडलेल्या छाप्याचा मुद्दा जोरात उपस्थित करण्यात आलेला आहे. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांविरोधात विरोधी सदस्यांनी निषेध करत घोषणाबाजी करून राज्यसभा दणाणून सोडली. त्यानंतर दुपारी अडीचपर्यंत कामामाज तहकूब करण्यात आले. तर, लोकसभेतही गोंधळ उडाला आहे. तिथे फोन टॅपिंग आणि हेरगिरीचा मुद्दाही उपस्थित झाला. लोकसभा देखील दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Advertisement
Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लहरीदरम्यान प्राप्तिकर विभागाने दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयांवर छापा टाकला आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान येथील कार्यालयांमध्ये कारवाई सुरू आहे. देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. भास्कर समूहावर कारवाई झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, देशातील सत्यता धैर्याने उघडकीस आणणार्‍या माध्यम समूहाला दाबण्याचा हा प्रयत्न आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, छापे हे माध्यमांना धमकावण्याचा प्रयत्न आहेत.

Advertisement
Advertisement

कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे की, हा मोदी-शाह यांचा पत्रकारितेवर हल्ला आहे. आयडी, ईडी, सीबीआयचे मोदि-शाह यांचे एकमेव शस्त्र आहे. मला खात्री आहे की अग्रवाल बंधू घाबरणार नाहीत. दैनिक भास्करच्या विविध ठिकाणी आयकर अन्वेषण शाखेने छापा टाकला आहे. प्रेस कॉम्प्लेक्ससह अर्धा डझन ठिकाणी आयकर अधिकारी उपस्थित आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.