Take a fresh look at your lifestyle.

कॉंग्रेसला दिलाय असाही झटका; मोदींच्या कृषी कायद्याला सेना-राष्ट्रवादीचा सॉफ्ट कॉर्नर..!

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये तिसरा भिडू असलेल्या काँग्रेस पक्षाला पाण्यात पाहण्याची नीती शिवसेना आणि भाजपने अजूनही सोडलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढवून आपला आत्मसन्मान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी देशभरात विरोधास सामोरे जावे लागत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा कायद्यांना सेना व राष्ट्रवादीने सॉफ्ट कॉर्नर दिला आहे.

Advertisement

संसदेत कृषी कायद्यांविरोधातील मतदानावेळी तटस्थ राहणारी शिवसेना आणि केंद्रांच्या कायद्यांबाबत शरद पवार यांची पोषक भूमिका असल्यामुळे गोची झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादीने आता वेगळाच डाव टाकला आहे. त्यामुळे केंद्राच्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या थेट ठरावाची मागणी असतानाही महाराष्ट्र सरकारने कृषी कायद्यांच्या मसुद्यावर जनतेच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करून दाखवली आहे.

Advertisement

कृषी कायदे थेट फेटाळून लावण्याचा काँग्रेसचा आग्रह डावलून राष्ट्रवादी व शिवसेनेने सभागृहात “जनतेच्या सूचनां’चा प्रस्ताव आणला आहे.  काँग्रेसची समजूत घालण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्र राज्यात हे कायदे लागू करण्याच्या दिशेने तर हे नियोजन नाही ना, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. दिल्लीत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांनी स्वतंत्र कृषी कायदे आणून स्पष्ट विरोध दर्शवला आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकार याप्रकरणी चाचपडत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

अखिल किसान संघर्ष समिती यांनी यावर म्हंटले आहे की, केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कृषी कायदे नाकारण्याचा थेट ठराव महाराष्ट्र शासनाने करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने “जनतेच्या चर्चे’साठी ठेवलेल्या मसुद्यावर सूचना किंववा हरकती नोंदवण्याची काहीही आवश्यकताच नाही. केंद्र सरकारच्या कारवायांच्या दगडांखाली हात अडकलेले महाविकास आघाडी सरकारमधील काही घटक पक्ष केंद्र सरकारला थेट विरोध करण्यास धजावत नसल्याने आता महाराष्ट्रात याप्रकरणी काँग्रेस पक्षाची गोची झाली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply