Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय भारतीयांना दिलासा..!

पुणे : आजही पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. ही एक महत्वाची बातमी आहे. कारण, रोजच दरवाढ होत असतानाही शांत असलेल्या भारतीयांना दरवाढ न होण्याची माहिती पचू कशी शकते, असाच प्रश्न काहींना पडला आहे. एका अर्थाने सलग 5 दिवस किंमत न वाढवणे हेही भारतीयांना दिलासा देणारे आहे.

Advertisement

सलग पाचव्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नाहीत. यापूर्वी शनिवारी पेट्रोलच्या दरात वाढ झाली होती. शनिवारी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

Advertisement

दरम्यान, दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 89.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये तर डिझेल 93.02 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी सहा वाजेपासून हे नवीन दर लागू होतात. आपण आपल्या फोनवरून दररोज नवीन किंमती एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला हा एसएमएस ‘ RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड’ इंडियन ऑईल एसएमएस सेवेच्या (SMS) खाली मोबाइल क्रमांकावर 9224992249 पाठवावा लागेल. आपण साइटला भेट देऊन आपल्या क्षेत्राचा आरएसपी कोड तपासू शकता. हा संदेश पाठविल्यानंतर, आपल्या फोनमध्ये इंधनाच्या नवीनतम किंमतीबद्दल माहिती येईल.

Advertisement

बातमी पावसाची : पहा कुठल्या भागाला दिलाय येलो अलर्ट; ‘त्या’ भागात होणार पाऊस

Advertisement

मोदी-शरीफांनी केलाय पाकिस्तानबद्दल ‘तो’ डाव; पहा नेमका काय आरोप केलाय इम्रानांच्या मंत्र्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply