Take a fresh look at your lifestyle.

बातमी पावसाची : पहा कुठल्या भागाला दिलाय येलो अलर्ट; ‘त्या’ भागात होणार पाऊस

पुणे : रायगड, पुण्यासह 5 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसात याठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात पुढील 24 तासात 204.4 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो. काही दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे.

Advertisement

सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर अचानक गायब झालेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या राजधानी मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईला येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या 5 दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबई, उपनगर तसेच वसई-विरार भागात जोरदार पावसास सुरुवात झाली आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या देशभरात अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या राज्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 10 ते 14 जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, हरियाणा, चंडीगढ आणि राजधानी दिल्ली येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे.

Advertisement

मोदी-शरीफांनी केलाय पाकिस्तानबद्दल ‘तो’ डाव; पहा नेमका काय आरोप केलाय इम्रानांच्या मंत्र्यांनी

Advertisement

पाकिस्तानवर कोसळले भयंकर संकट; पहा काय केविलवाणी परिस्थिती झालीय देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply