Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या नावाने लूट..! नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना सावध न राहिल्यास सावज होण्याची शक्यता..पाहा कशी सुरुय लूटमार..?

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून लूटण्याचा प्रकार काही नवीन नाही. त्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समाेर आले आहे. सरकारी नोकरीसाठी तर अनेक जण मागचा पुढचा विचार न करता, लाखो रुपये अगदी अनोळखी माणसाच्या हवाली करतात. फसवणूक झाल्यावर त्यांच्यावर तोंड झोडून घ्यायची वेळ येते.

Advertisement

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे सध्या अनेक जण बेरोजगार आहेत. ही संधी साधून काहींनी नोकरीचे आमिष दाखवून लूटमार सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

आता तर काही अट्टल गुन्हेगारांनी थेट मोदी सरकारच्या नावानेच फसवणूक धंदा सुरु केला आहे. पीएम रोजगार योजनेची वेबसाइट बनवून त्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे पुढे आलेय.

Advertisement

अशा फेक वेबसाइटवर क्लिक केल्यास फटका बसलाच म्हणून समजा. अशा ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणे टाळणेच ईष्ट होईल. केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फाॅरमेशन ब्युरो’ या संस्थेच्या ‘फॅक्ट चेक’ने याबाबत लोकांना सावध केले आहे. या बनावट वेबसाइटबाबत पीआयबी फॅक्ट चेकने माहिती दिलीय.

Advertisement

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाइटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. त्यासाठी 100 रुपये नोंदणी शुल्क घेतले जात आहे.

Advertisement

ही वेबसाइट आणि हे नोटिफिकेशन फेक आहे. नागरिकांना अशा कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती PIB ने केलीय.

Advertisement

तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना वा धोरणांबाबत सत्यतेबाबत संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ताे पाठवू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, तसेच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्स अपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply