Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तान-चीनलाही बसणार ‘चेकमेट’; पहा रशियाने काय ऑफर दिलीय भारताला..!

दिल्ली : जगातील शस्त्रास्त्र बाजारात मागे पडत असलेल्या रशियाने अमेरिकेला आव्हान देण्यासाठी आता सर्वात प्राणघातक असे ‘सुखोई चेकमेट’ लढाऊ विमान लॉंच केले आहे. पाचव्या पिढीचे हे लढाऊ विमान आकाशात अमेरिकेच्या सर्वात प्रगत अशा एफ 35 विमानाला चेकमेट देईल. तसेच त्यामुळे भारतही चीन व पाकिस्तानला चेकमेट करू शकणार आहे.

Advertisement

रशियाचे म्हणणे आहे की, हे लढाऊ विमान शत्रूच्या अत्याधुनिक रडारला चाप लावण्यास सक्षम आहे आणि सुपरसोनिक वेगाने उड्डाण करू शकते. सुखोई चेकमेटचे महत्त्व यावरून दिसून येते की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वत: एमएकेएस 2021 एअर शो दरम्यान या प्राणघातक विमानाचा आढावा घेतला होता. हे विमान सुप्रसिद्ध रशियन कंपनी सुखोई यांनी बनवले आहे. एवढेच नव्हे तर रशियाने आपल्या या प्राणघातक विमानाला आपला विश्वासू मित्र भारत यांना विक्री करण्याचीही ऑफर दिली आहे.

Advertisement

मॉस्को येथे आयोजित त्याच्या प्रसिद्ध एअर शोमध्ये रशियाने सुखोई चेकमेट लढाऊ विमान सादर केले. त्याला हलके सामरिक विमान असे म्हटले जात आहे. सुखोई 55 च्या तंत्रज्ञानावर आधारित रशियाने हे विमान बनवले आहे. रशियाने हे विमान अतिशय वेगवान बनविले आहे आणि त्याचे कारण असे की त्याने सुखोई 57 च्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एकच इंजिन असलेली सुखोई चेकमेट विमान शस्त्रे आत लपवून ठेवते ज्यामुळे ते रडारवर पकडले जाण्याची शक्यता नसते. या कारणास्तव याला पाचव्या पिढीचे लढाऊ विमान म्हटले जात आहे.

Advertisement

या विमानाजवळील प्रदर्शनात म्हटले आहे की चेकमेट लढाऊ विमानात आर 73 अँटी क्षेपणास्त्र, आर 77 अँटी एअर क्षेपणास्त्र आणि केएच 59 एमके अँटी-शिप क्रूझ मिसाईल बसविण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की हे विमान हवेचे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांना लक्ष्य करण्यासाठी वापरले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर चेकमेट त्याच्या शस्त्रास्त्रामध्ये क्षेपणास्त्र आकाराचे ड्रोन ठेवण्यास सक्षम असेल. हे विमान माच 2.2 मॅकच्या वेगाने 54 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकेल.

Advertisement

हे विमान युएई, भारत, व्हिएतनाम आणि अर्जेंटिनाला विकले जाऊ शकते. रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह म्हणाले की, ते आफ्रिकी देश, भारत आणि व्हिएतनामसाठी निश्चितच तयार केले गेले आहेत. अशा विमानांची मागणी खूप जास्त आहे. येत्या काळात 300 पेक्षा जास्त लढाऊ विमानांची विक्री होईल, असा आमचा अंदाज आहे. भारत हा रशियन शस्त्रास्त्रांचा एक मोठा खरेदीदार आहे. रशियाच्या सुखोई आणि मिग कंपन्यांकडून भारताने आतापर्यंत अनेक लढाऊ विमानांची खरेदी केली आहे.

Advertisement

अर्र.. काळजी घ्या रे.. चीनने आणखी एकदा वाढवलीय डोकेदुखी; पहा काय संकट आलेय तिकडे

Advertisement

पंकजा मुंडेंनी तयारी केलीय सोलो सिनेमाची; पहा फडणवीसांबद्दल नेमके काय म्हटलेय ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.