Take a fresh look at your lifestyle.

मोदी-शरीफांनी केलाय पाकिस्तानबद्दल ‘तो’ डाव; पहा नेमका काय आरोप केलाय इम्रानांच्या मंत्र्यांनी

दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाडवैर संपू न देता पाकिस्तानी नागरिकांना झुलवत ठेऊन राजकीय पोळी भाजण्याचे उद्योग अजूनही सुरू आहेत. भारतातही असेच उद्योग केले जातात. आता त्याचाच परिपाक म्हणून पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्यांनी भारताला मध्ये घेऊन माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत.

Advertisement

इस्त्रायली गुप्तचर सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचा फोन हॅक झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात इम्रान खानचा फोन हॅक झाल्याची शंका उपस्थित केली. हबीब म्हणाले की, अशी शक्यता आहे की, “मित्र” नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नवाझ शरीफ यांनी इस्त्रायली सॉफ्टवेअरच्या मदतीने इमरान खान यांचा फोन हॅक केला.

Advertisement

हबीब म्हणाले की, मोदी सरकारदेखील एनएसओ ग्रुपच्या ग्राहकांपैकी एक आहे. नवाझ शरीफ यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आणि जम्मू-काश्मीरच्या हुर्रियत नेत्यांचीही भेट घेतली नाही. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन हॅक का केला गेला असा प्रश्न देशात निर्माण होत असल्याचे हबीब म्हणाले. नवाझ शरीफ यांच्याबाबत न्यायाधीशांचे फोन टॅप करण्याचा मोठा इतिहास आहे, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

यापूर्वी पाकिस्तानने असे म्हटले होते की, ते आवश्यक असलेल्या जागतिक मंचांवर भारताच्या हेरगिरीचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन भारतातून हॅक करण्याबाबत त्यांचा देश अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे. फोन हॅक झाल्याची संपूर्ण माहिती मिळताच योग्य मंचांमध्ये ती उपस्थित केली जाईल. पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तानुसार, फोन हॅक झाल्याच्या यादीत इम्रान खानही पहिल्या क्रमांकावर आहेत. एका दाव्यानुसार, भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी दीडशेहून अधिक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्त्यांवर हेरगिरी केली आहे.

Advertisement

पेट्राल-डिझेलवरील करांतून मोदी सरकारची छप्परतोड कमाई.. गेल्या आर्थिक वर्षात किती कमावलेय, तुम्हीच पाहा..

Advertisement

पाकिस्तानवर कोसळले भयंकर संकट; पहा काय केविलवाणी परिस्थिती झालीय देशाची

Advertisement
Advertisement

Leave a Reply