Take a fresh look at your lifestyle.

आणि भारताच्या ‘पेगासस’ मुद्द्यावर भडकला पाकिस्तान; पहा काय म्हटलेय इम्रान खान यांच्या मंत्र्यांनी

मुंबई : इस्त्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या फोनवर हेरगिरी केल्याच्या शक्यतेने पाकिस्तानला हादरा बसला आहे. पाकिस्तानने असे म्हटले आहे की, भारताच्या हेरगिरीचा मुद्दा जगातील महत्वाच्या मंचांवर उपस्थित केला जाईल. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन भारतातून हॅक करण्याबाबत त्यांचा देश अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे.

Advertisement

चौधरी म्हणाले की, इम्रान खानचा फोन हॅक झाल्याची संपूर्ण माहिती मिळताच योग्य मंचांमध्ये ती उपस्थित केली जाईल. यापूर्वी, आपल्या एका ट्विटमध्ये चौधरी यांनी चिंता व्यक्त केली होती की भारत पत्रकार आणि राजकारण्यांचा फोन हॅक करत आहे. यापूर्वी पाकिस्तानी माध्यमांमधील बातम्यांमध्ये असे म्हटले जात होते की, फोन हॅक झाल्याच्या यादीत इम्रान खान देखील पहिल्या क्रमांकावर आहे.

Advertisement

इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरच्या फोन हॅकिंग वादामुळे भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, फोन हॅक होत असलेल्याच्या यादीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेदेखील पहिल्या क्रमांकावर आहेत. एका दाव्यानुसार, भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी दीडशेहून अधिक पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्त्यांवर हेरगिरी केली आहे.

Advertisement

पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध ‘डॉन’ या वृत्तपत्राने ‘द पोस्ट’च्या हवाल्याने म्हटले आहे की, पाळत ठेवल्या गेलेल्या भारतातील किमान एक हजार लोकांच्या यादीमध्ये अनेक दिग्गज समाविष्ट आहेत. तसेच पाकिस्तानमधील शंभर लोकही यात आहेत. यापैकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही असा प्रयोग केला आहे. मात्र, इम्रान खान यांच्या नंबरचा हॅकिंग करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला की नाही हे पोस्टने स्पष्ट केले नाही.

Advertisement

त्याचबरोबर या यादीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाने भारतातील राजकीय वादळ वाढले आहे. अहवालानुसार, भारतातील मंत्री, विरोधी नेते, पत्रकार आणि वैज्ञानिकांपर्यंत किमान 300 लोकांचा यादीत समावेश आहे. हा अहवाल भारतात समोर आल्यानंतर पाकिस्तानी केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी चिंता व्यक्त केली होती आणि मोदी सरकारवर देशाचे ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला होता.

Advertisement

सन 2019 मध्ये भारत सरकारने या सॉफ्टवेअरचा वापर नाकारला होता. 2016 मध्ये हे मालवेअर सर्वप्रथम चर्चेत आले होते. संशोधकांनी इस्राईलच्या एनएसओ गटावर संयुक्त अरब अमिरातीमधील एका व्यक्तीची हेरगिरी करण्याचा आरोप केला होता, तेंव्हापासून हे चर्चेत आहे.

Advertisement

पेट्राल-डिझेलवरील करांतून मोदी सरकारची छप्परतोड कमाई.. गेल्या आर्थिक वर्षात किती कमावलेय, तुम्हीच पाहा..

Advertisement

‘व्हिडीओकॉन’ची कवडीमोल भावात खरेदी..! वेदांता समूहाच्या प्रयत्नांना खिळ, पाहा नेमकं काय झालंय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply