Take a fresh look at your lifestyle.

पेट्राल-डिझेलवरील करांतून मोदी सरकारची छप्परतोड कमाई.. गेल्या आर्थिक वर्षात किती कमावलेय, तुम्हीच पाहा..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विरोधी पक्षांसह जनता त्याविरोधात आवाज उठवत असताना, केंद्र सरकार मात्र इंधन दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना कारणीभूत ठरवित आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलवर लादलेल्या करांतूनच गेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने छप्परतोड कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

इंधनावरील करांच्या माध्यमातून 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत मोदी सरकारच्या तिजोरीत 3.35 लाख कोटींची भर पडली. आधीच्या वर्षांच्या तुलनेत 88 टक्क्य़ांनी त्यात वाढ झालीय. कोरोना संकटात सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव प्रचंड घसरलेले असतानाही मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली नाही. त्यानंतर मे 2020 मध्ये पेट्रोलवरील उत्पादनशुल्कात विक्रमी वाढ केली.

Advertisement

परिणामी पेट्रोलवरील उत्पादनशुल्क लिटरमागे 19.98 रुपयांवरून 32.9 रुपयांवर गेले, तर डिझेलवरील उत्पादनशुल्कही प्रति लिटर 15.83 रुपयांवरून 31.8 रुपयांवर गेले. एप्रिल 2019 ते मार्च 2020 मध्ये इंधनावरील उत्पादनशुल्काच्या माध्यमातून आलेले उत्पन्न 1.78 लाख कोटी रुपये होते.

Advertisement

करवाढीचा परिणाम म्हणून एप्रिल 2020 ते मार्च 2021 दरम्यान सरकारच्या तिजोरीत केवळ पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन कराद्वारे 3.35 लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत दिली आहे.

Advertisement

‘इक्रा’ या रेटिंग एजन्सीने जूनमध्ये सर्वेक्षण केले. त्यात केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले, तरी उत्पन्नात विशेष फरक पडणार नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षातील परिस्थिती पाहता, पेट्रोल-डिझेलची मागणी 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, इंधनाच्या दरात कपात न झाल्यास, ही मागणी 13 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल.

Advertisement

2021 मध्ये आतापर्यंत पेट्रोलची मागणी 10.6 टक्क्यांनी घटली आहे, तर इंधनावरील करापोटी केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात 55 टक्क्यांनी वाढ होऊ ते 3.5 लाख कोटी इतके झाल्याचे ‘इक्रा’च्या अहवालात म्हटले होते.

Advertisement

पेगासस कांडाचा पाकिस्तानलाही झटका; पहा नेमके काय म्हटलेय ‘डॉन’ने
‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर कोण? भाजप खासदार स्वामी यांनीच केलाय बडा सवाल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply