Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांतदादांनी केलेय महत्वाचे आवाहन; पहा काय म्हटलेय महाराष्ट्राला

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला करोना कालावधीत काळजी घेऊन व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. योग्य पद्धतीने करोना प्रोटोकॉल पालन करून आपली आणि एकूण समाजाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोणताही हलगर्जीपणा न करता महाराष्ट्राच्या जनतेला मी हे आवाहन करू इच्छितो की, कोरोनाचे गांभीर्य ओळखून मास्कचा सतत वापर आपण करावा. आपण स्वतःची काळजी घेतली तर आपला जिल्हा आणि आपले राज्य सुरक्षित राहील. चला मास्कचा वापर करूया आणि राज्याला व स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवूया.

Advertisement

देशभरात लसीकरण सुरू असून त्याच्या आकडेवारीची माहिती देताना त्यांनी म्हटलेय की, भारतात सुरू असलेल्या जगातील मोठ्या लसीकरण मोहिमेची कामगिरी त्याच वेगात सुरू असून आतापर्यंत देशात ४१.१८ कोटींपेक्षा अधिक लोकांनी लसीकरण केले आहे. महाराष्ट्रात ४.०१ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी लसींचे डोस घेतले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply