Take a fresh look at your lifestyle.

एसी, फ्रिज महागणार.. आताच करा खरेदी, पाहा कंपन्यांनी कशामुळे घेतलाय हा निर्णय..?

मुंबई : गेल्या 6 महिन्यांपासून पोलाद, तांब्यासारख्या कच्च्या मालाच्या किमती २०-२१ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. परिणामी, लवकरच एसी, फ्रिज, टीव्ही, तसेच मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशरसारख्या ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती 6 महिन्यांत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यात साधारण ४-५ % दरवाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

याआधी जानेवारी-फेब्रुवारीत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती वाढल्या होत्या. यंदा पहिल्या सहामाहीत होम अप्लायन्सेसच्या किमती १२ % पर्यंत वाढल्या आहेत. आताही ७-८ % दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

जुलैअखेर या वस्तूंच्या किंमतीत ३-५ % वाढ होऊ शकते. अनेक कंपन्यांनी उत्पादनाच्या किमती एकदाच वाढविण्याऐवजी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये थोड्या-थोड्या वाढविण्याचा प्लॅन केला आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अंड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (सीएमा) अध्यक्ष व गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांच्यानुसार, कमोडिटीच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, काहीशी गुंतवणूक वाढल्यामुळे कूलिंग प्रॉडक्ट्स व होम अप्लायन्सेच्या किमती वाढविण्याशिवाय उद्योगांपुढे पर्याय नाही.

Advertisement

व्हाइट गुड्स उद्योगासाठी वर्षातील सुरुवातीचे तीन महिने चांगले गेले. नंतर एप्रिल-जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. कोविड महामारीच्या या दुसऱ्या लाटेने देशभरात स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करण्यात आला. उन्हाळ्यातील पीक सीझनमध्येही एसी, फ्रिजची विक्री होऊ शकली नाही.

Advertisement

सिएमाच्या सूत्रांनुसार, एप्रिलमध्ये होम अप्लायन्सेसची विक्री निम्मी झाली. मेमध्ये विक्री झाली नाही, जूनमध्ये जवळपास ७० % विक्री झाली. आता माॅन्सून आला आहे. परिणामी, कूलिंग श्रेणीत विक्रीची जास्त अपेक्षा नाही.

Advertisement

स्टील, तांबे, अॅल्युमिनियमच्या किमती वाढल्याने होम अप्लायन्सेस कंपन्यांना त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, एकदम किमती वाढविण्याऐवजी तीन महिन्यांत थोड्या-थोड्या वाढविण्यात येणार असल्याचे कंझ्यु. इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले.

Advertisement

वाढत्या गुंतवणुकीमुळे एसी, फ्रिजच्या किमती जुलैमध्ये ४-५% वाढल्या. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे व्हाइट गुड्सचा उत्पादनखर्चही वाढल्याचे पॅनासोनिक इंडिया आणि द. आशियाचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी सांगितले.

Advertisement

सोन्याच्या दरात वाढ, चांदीत मात्र घसरण..! सराफ बाजारातील आजची स्थिती पाहा..
व्हिडीओकॉनची कवडीमोल भावात खरेदी..! वेदांता समूहाच्या प्रयत्नांना खिळ, पाहा नेमकं काय झालंय..?

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply