Take a fresh look at your lifestyle.

करोनाने झालेय तब्बल 50 लाख मृत्यू; पहा भारताबाबतच्या अहवालात नेमके काय म्हटलेय

दिल्ली : वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर ग्लोबल डेवलपमेंटने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे, की भारतात जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात कोविड 19 मुळे जवळपास 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या फाळणीनंतरची ही सर्वात मोठी मानवी शोकांतिका आहे. मात्र, भारतामध्ये सरकारी यंत्रणेने यावर अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

Advertisement

दरम्यान, याआधी जगातील प्रसिद्ध असलेल्या ‘द इकॉनॉमिस्ट’ ने जगातील अनेक देश कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची योग्य माहिती देत नसल्याचा दावा केला होता. जगभरात 70 लाख ते 1.3 कोटी मृत्यू या आजारामुळे झाले आहेत, असा दावा केला होता. या अहवालात असेही म्हटले होते, की आफ्रिका आणि आशियातीलच नाही तर अमेरिका आणि युरोपातील देशांनी सुद्धा खरी माहिती दिलेली नाही. भारतात सुद्धा सरकारकडून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची जी माहिती देण्यात येत आहे. त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले होते.

Advertisement

कोरोना जगात दाखल झाल्यापासून या घातक आजाराने लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. भारतात तर दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. या लाटेत हजारो जणांचे प्राण गेले. या आजाराने किती लोकांचा मृत्यू झाला याची आकडेवारी सरकारी यंत्रणा देत असल्या तरी त्यावर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न सध्या आहे. कारण, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून वेळोवेळी जे काही अहवाल प्रसिद्ध केले जात आहेत, ते पाहता सरकारी यंत्रणांनी दिलेल्या मृत्यूच्या आकडेवारीवर कुणाचाही विश्वास बसणार नाही. आता पुन्हा असाच एक अहवाल आला आहे. अमेरिकेतील एका अध्ययनाद्वारे असा दावा करण्यात आला आहे, की भारतात कोरोनामुळे 34 ते 49 लाख रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. हा आकडा भारत सरकारने दिलेल्या मृत्यूंच्या आकड्यांच्या दहा पट जास्त आहे.

Advertisement

या अहवालात असाही दावा केला आहे, की कोरोनाची पहिली लाट सुद्धा अंदाजापेक्षा जास्त घातक ठरली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरता, बेड आणि लसींची टंचाई या समस्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान कोरोनाबाबत आकडेवारी योग्य वेळी संकलित केली गेली नाही. त्यामुळे या पहिल्या लाटेत सुद्धा दुसऱ्या लाटेवेळी जितके मृत्यू झाले तितकेच मृत्यू झाले असावेत, अशी शक्यता असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

बातमी पावसाची : पहा कुठल्या भागाला दिलाय येलो अलर्ट; ‘त्या’ भागात होणार पाऊस

Advertisement

मोदींच्या ‘त्या’ योजनेचा झालाय पर्यावरणपूरक परिणाम; पहा काय देवा केलाय भाजपने

Advertisement
Advertisement

Leave a Reply