Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय अमेरिकन अहवालात

वॉशिंग्टन : आयुर्मानातील 74 टक्के घट हे कोरोना संसर्गामुळे झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी अमेरिकेत 33 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 11 टक्के मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत, अशी कबुली अमेरिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिलेली आहे.

Advertisement

कोरोनाने जगभरात थैमान घातले. जगातील अगदीच मजबूत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या घातक विषाणूने सोडले नाही. उलट या देशाचे सर्वाधिक नुकसान केले. देशाची अर्थव्यवस्थाच नाही तर येथील लोकांच्या आयुष्यावरही या विषाणूने वाईट परिणाम केला आहे. होय, कोरोनामुळे अमेरिकेत अन्य देशांच्या तुलनेत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. तसेच येथील लोकांचे आयुर्मान सुद्धा घटले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच देशातील नागरिकांच्या आयुर्मानाच्या दरात इतकी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की गेल्या अनेक वर्षांत देशात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू कधीच झाले नव्हते. तसेच येथील लोकांचे आयुर्मान सुद्धा घटले आहे. मात्र, कोरोना व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळे देखील आयुर्मान कमी झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. येथे औषधांच्या ओव्हरडोजमुळे देखील आयुर्मान कमी झाले आहे. या व्यतिरिक्त, आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच गर्दीच्या ठिकाणांमुळे सुद्धा या समस्या आल्या आहेत. कोरोना महामारीचा फटका कमी पगारात काम करणाऱ्या लोकांना जास्त बसला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड 19 च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे.

Advertisement

कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply