Take a fresh look at your lifestyle.

कॉंग्रेसच्या नाना पटोलेंचे स्वबळ; ‘त्यांना’ही आलीय मग निवडणुकीची उबळ..!

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभरात तिसरा भिडू म्हणून आपली ताकद वाढवण्यासाठी आता कॉंग्रेस पक्ष तयार झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीवारी करून यासाठी पक्षश्रेष्ठींची परवानगी आणली आहे.

Advertisement

त्यामुळे पुढील निवडणुकीत राज्यात शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यासह इतर स्थानिक आघाड्या अशीच दणक्यात लढत होण्याचा मार्ग खुला झालेला आहे. आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यावर अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. कारण, तीन पक्षाचे इच्छुक एकत्रित आणणे तसेही महाविकास आघाडीला अशक्य आहे.

Advertisement

मग अशावेळी बंडखोर थेट भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. हेच टाळण्यासह पक्षाचा जनाधार पुन्हा एकदा वाढवण्याच्या दृष्टीने राज्यात पटोले यांनी स्वबलाचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या तिकिटावर लढून जिंकण्यासाठी आणखी एक पर्याय अनेक इच्छुकांना खुला झाला आहे.

Advertisement

पटोले यांनी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाल्यावर राज्यात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली. पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून प्रदेश कार्यकारणी व रिक्त जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Advertisement

पाचपुतेंच्या ‘काष्टी’मध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार; पहा नेमके काय घडलेय प्रकरण

Advertisement

रेशन दुकानात हेलपाटे मारण्याची झंझट नाही, आता एटीएमद्वारे मिळणार धान्य, पाहा कोणी सुरु केलाय हा अनोखा उपक्रम..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply