Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींनी दाखवलाय पटोलेंवर विश्वास; पहा पक्ष घेणार किती मोठा घास..!

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाल्यावर राज्यात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केली. पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून प्रदेश कार्यकारणी व रिक्त जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Advertisement

एकूणच राज्यात कॉंग्रेस पक्षाची आक्रमकपणे बांधणी करणाऱ्या पटोले यांना राहुल गांधी यांनी ताकद दिल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालेले आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार अशी घोषणा करतानाच २०२४ च्या विधानसभा, लोकसभेचा स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील असेही पटोले यांनी म्हटलेले आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल आणि २०२४ मधील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेस निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

पटोले यांनी मंगळवारी प्रथमच राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या समवेत प्रभारी एच. के. पाटील असताना ही सुमारे दीड तासांची बैठक झाली. राहुल यांना पटोले यांचा आक्रमक बाणा पसंत पडला असल्याचे सुतोवाच यामुळे मिळालेले आहेत. पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार असून प्रदेश कार्यकारणी व रिक्त जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यासह निवडणुका स्बळावर लढण्यास राहुल यांनी अनुमती देतानाच नागपूर, मुंबई व औरंगाबादेत रॅली करून पक्षाच्या वाढीला गती देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचेही राहुल गांधी यांनी मान्य केले आहे.

Advertisement

राहुल गांधी ‘त्या’ मुद्द्यावर झालेत आक्रमक; पहा नेमके काय म्हटलेय मोदी सरकारबाबत

Advertisement

‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर कोण? भाजप खासदार स्वामी यांनीच केलाय बडा सवाल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply