Take a fresh look at your lifestyle.

‘व्हिडीओकॉन’ची कवडीमोल भावात खरेदी..! वेदांता समूहाच्या प्रयत्नांना खिळ, पाहा नेमकं काय झालंय..?

मुंबई : वेदांता समूहाच्या ‘ट्विन स्टार टेक्नाॅलाॅजी’ने नुकतीच ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज’ खरेदी केली. मात्र, अतिशय कवडीमोल भावात ही खरेदी करण्यात आल्याने राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय लवादाच्या मुंबई खंडपीठाने (एनसीएलएटी) ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज’च्या विक्रीला स्थगिती देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘वेदांता’चे प्रमुख अनिल अगरवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

‘व्हिडिओकॉन’ला कर्ज देणाऱ्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’नेही वेदांता समूहाच्या या व्यवहारावर हरकत घेत ‘एनसीएलटी’च्या मुंबई खंडपीठाकडे अपील केले होते. त्यावर राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय लवाद, मुंबईच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Advertisement

‘ट्विन स्टार टेक्नाॅलाॅजी’च्या खरेदी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करताना ‘एनसीएलएटी’चे न्यायाधीश ए. आय. एस चिमा म्हणाले, की ‘व्हिडीओकॉन’साठी यशस्वी बोली लावणाऱ्या ‘ट्विन स्टार टेक्नाॅलाॅजी’ने केवळ २६२ कोटींमध्ये ‘व्हिडीओकॉन’ खरेदी केली. त्यासाठी २५ महिन्यांत २०० कोटींचा पहिला हप्ताही अदा करण्यात आला. त्यामुळे हा व्यवहार तूर्त स्थगित ठेवण्याचा आदेश त्यांनी दिला.

Advertisement

दरम्यान, गेल्या महिन्यात ‘एनसीएलटी’च्या मुंबईत खंडपिठाने ‘ट्वीन स्टार टेक्नाॅलाॅजी’ने सादर केलेल्या प्रस्तवाला मान्यता दिली होती. मात्र, त्याच वेळी या संपूर्ण व्यवहाराच्या मूल्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ‘ट्विन स्टार टेक्नाॅलाॅजी’ने व्हडिओकॉन समूहातील १३ कंपन्यांच्या खरेदीसाठी २९६२ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. एकूण रक्कम आणि कंपन्यांची संख्या पाहता ट्विन स्टार टेक्नाॅलाॅजी अक्षरश: कवडी मोलात व्हिडीओकॉन खरेदी करत असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

बँक ऑफ महाराष्ट्रने या व्यवहाराला अपीलीय लवादाकडे आव्हान दिले आहे. आता अपीलीय लवदाने व्यवहाराला स्थगिती दिल्याने स्वस्तात एखादी दिवाळखोरीतील कंपनी घेण्याच्या उद्योजक अनिल अगरवाल यांच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे.

Advertisement

‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर कोण? भाजप खासदार स्वामी यांनीच केलाय बडा सवाल..!
सोन्याच्या दरात वाढ, चांदीत मात्र घसरण..! सराफ बाजारातील आजची स्थिती पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply