Take a fresh look at your lifestyle.

अटेन्शन.. वाचा खिशाला झटका देणारी बातमी; RBI ने घेतलाय ‘तो’ही निर्णय

मुंबई : एकेकाळी बँका ठेवी (bank savings) आणि कर्ज (loan) या दोन्हींच्या मधल्या फरकावर चालायच्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ही प्रथा बदलते की काय अशीच शक्यता निर्माण झाल्याची ही बातमी आहे. कारण, आता बँका थेट सेवाशुल्क (service fee) वसुली आणि दंड यांच्या जीवावर चालवण्याचे धोरण असल्यागत रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) यांनी एक दणक्यात निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सगळ्यांचा खिशाला झटका बसणार आहे.

Advertisement

सध्या ग्राहक शुल्काची मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये आहे. यामध्ये आता वाढ होऊन 21 रुपये होणार आहे. या नव्या दरानुसार 1 जानेवारी 2022 पासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना मात्र जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण, बँकांनी नियम केले तरी प्रत्येकालाच याची माहिती होते असे नाही. परिणामी अनेकांना आणखी जास्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली क्रेडीट कार्ड (Credit Card) शुल्क आणि आता हे वाढीव शुल्क असे शुक्लकाष्ट भारतीयांच्या मागे कायम आहे.

Advertisement

पैशांची गरज पडल्यास आपण पटकन एखाद्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन खात्यातून पैसे काढतो. मात्र, आता पैसे काढतानाही विचार करावा लागणार आहे. कारण, रिजर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दुसऱ्या बँकेच्या ‘एटीएम’ मधून पैसे काढण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेने ग्राहक शुल्क आणि बिगर बँक एटीएम शुल्कात वाढ केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून देशभरात सुरू होणार आहे. त्यामुळे आता बँकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास जास्त चार्जेस द्यावे लागतील. एटीएम द्वारे आपल्या बँक खात्यातून पैसे काढताना हा विचार आता करावाच लागेल.

Advertisement

‘एटीएम इंटरजेंच फी’ म्हणजे आपल्या बँकेच्या एटीएम व्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास आकारले जाणारे शुल्क. या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 1 ऑगस्टपासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. याआधी अशा प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये शुल्क होते. आता मात्र, नव्या निर्णयानुसार 17 रुपये केले आहे. बँक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी 5 व्यवहारांसाठी शुल्क घेतले जाणार नाही. हा टप्पा पार केल्यानंतर मात्र पुढच्या व्यवहारांसाठी शुल्क द्यावे लागेल. गैरवित्तीय व्यवहारांसाठी 5 ऐवजी 6 रुपये द्यावे लागतील. बँक ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएम द्वारे मेट्रो शहरात 3 वेळा आणि लहान शहरांध्ये 5 वेळा आर्थिक व्यवहार विनाशुल्क करता येतील.

Advertisement

Advertisement

Leave a Reply