Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या ‘त्या’ योजनेचा झालाय पर्यावरणपूरक परिणाम; पहा काय देवा केलाय भाजपने

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना कालावधीत झालेल्या चुकांमुळे देश आरोग्य आणि आर्थिक संकटात गेल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. त्याबाबतचे अहवाल दररोज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होत आहेत. त्यातच आता भाजपने ही बिघडलेली परिस्थिती सावरताना जोरदार सोशल मिडिया कम्प्नेनिंग केले आहे. महाराष्ट्र भाजपने त्याबाबतच्या माहितीची मराठीत माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ट्विटर खात्यावर रोज वेगवेगळी माहिती आणि आकडेवारी शेअर केली जात आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांनी देशवासीयांचा विश्वास जिंकला असून आता केवळ विकास या ध्येयाकडेच सरकारची यशस्वी वाटचाल सुरू आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात या योजनांचा राज्यातील नागरिकांनाही मोठा लाभ मिळाला आहे. मा. मोदी जी यांच्या नेतृत्वात आता भारत पूर्णपणे सक्षम झाला आहे.

Advertisement

तसेच उज्वला योजनेतून मिळणाऱ्या गॅस सिलेंडरला अनुदान मिळत नसल्याचे विसरून त्या योजनेचे इतर फायदेही त्यांनी सांगितले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, प्रधानमंत्री उजाला योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण देश खऱ्या अर्थाने उज्ज्वल झाला आहे. देशात ३.८६ कोटी टन तर महाराष्ट्रात २३,११,२२५ लाख टन प्रतिवर्ष CO2 उत्सर्जनात घट झाली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रात २८,५३,३६४ MWh पेक्षा अधिक ऊर्जेची बचत झाली आहे.

Advertisement

उच्च शिक्षणाच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोदी सरकारने १९४ मॉडेल डिग्री कॉलेज उभारण्यास मान्यता दिली आहे. यापैकी ९ कॉलेज महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा.श्री. धर्मेंद्र प्रधान यांचे मनःपूर्वक आभार, असेही आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply