Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात वाढ, चांदीत मात्र घसरण..! सराफ बाजारातील आजची स्थिती पाहा..

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर विशिष्ट पातळीत वरखाली होत आहेत. कोरोना, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम, यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेतला जात आहे. मागील आर्थिक वर्षात (2020-21) ‘गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स’मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवले आहेत.

Advertisement

सातत्याने 47 हजारांच्या आसपास असणारा सोन्याचा दर आज पुन्हा वधारला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) मंगळवारी सोन्याच्या भावात 0.38 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या सत्रातही सोन्याच्या दरात 0.12 टक्क्यांची वाढ दिसली होती. दुसरीकडे चांदीच्या दरात आज घसरण झाली.

Advertisement

मंगळवारी MCX बाजारपेठेत सोन्याचा दर 181 रुपयांनी वधारून प्रति तोळा 48,275 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औंस 1800 डॉलर्सवर पोहोचले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा प्रतितोळा दर 56,200 रुपये इतका होता.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज आहे.

Advertisement

सध्या सोन्याचा दर दोन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला, तेव्हा सोन्याचा प्रति तोळा दर 46,615 रुपये होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे.

Advertisement

सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Advertisement

IMP Info : भारतात सुरूये ‘पोर्न’चाही बाजार; राज कुंद्रा यांच्या निमित्ताने पहा देशभरातील अश्लीलतेचे वास्तव काय ते
मोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी काय घडलीय घटना

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply