Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ मुंबई विमानतळाचे मुख्यालय गुजरातेत शिफ्ट; पहा नेमके काय म्हटलेय सचिन सावंतानी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) ताब्यात गेलेले आहे. त्यावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झालेले आहेत. त्यातच विमानतळाचा संपूर्ण ताबा मिळताच एएएचएलचे मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतल्याने कॉंग्रेस आणि मनसे यांनी टीका केली आहे.

Advertisement

Advertisement

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले.

Advertisement

तर, मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी झिंगाट दाखवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय … विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…

Advertisement

जीव्हीकेकडून अदानी समूहानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा मिळवण्यासह नवी मुंबईतील प्रस्तावित ताबाही ‘एएचएल’कडे आहे. मुंबईतून गुजरातकडं जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली असल्याने आता हा मुद्दा राजकीय झाला आहे. मुंबईसह देशातील इतर सहा विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडे दिली जात आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply