Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचे दुर्दैवच की.. म्हणून अवघा ग्रामीण भाग करतोय पाण्यासाठी त्राही भगवान..!

जळगाव : राज्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत अनेक पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. एकाच गावात २ ते ५ योजना राबवूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव या महाराष्ट्रात आहे. या संकटावर मात करण्यात शासन यंत्रणा कमी पडली आहे. कारण, अधिकाऱ्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन दणक्यात पैसे खाल्ल्याने पाण्यासारखा पैसा खर्च करूनही महाराष्ट्र तहानेला आहे.

Advertisement

त्यावरचे नेमके बोट ठेवण्याचे काम राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मात्र, आता तेही यावर फ़क़्त बोलणार की ठोस कार्यवाही करणार यावर ग्रामीण भागातील महिलांच्या डोकावरील हंड्याचे वास्तव ठरणार आहे. जळगाव येथे सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन मंडळ कार्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण करताना मंत्री पाटील यांनी वास्तव मांडले आहे.

Advertisement

मंत्र्यांनी म्हटले आहे की, जुन्या पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आल्या. योजना पूर्ण झाल्या तरी गावांमध्ये पाणीटंचाई आहे. ग्रामपंचायतींमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांनी थम्बअप करून (अंगठे लावून) भ्रष्टाचार केला. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनीही पाणीपुरवठा योजनांमधील अंमलबजावणीतील उणिवांवर बोट ठेवत ५० वर्षे टिकेल, अशी पाणीपुरवठा योजनांची पाइपलाइन करण्याची अपेक्षा व्यक्त केल्यावर त्यांनी याला उत्तर देताना वास्तव सांगितले.

Advertisement

आमदार पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही शुद्ध पाणी मिळण्याच्या मूलभूत हक्कापासून नागरिक वंचित अाहेत. ही शोकांतिका आहे. सगळीकडे राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांची दुरवस्था झाली आहे. पाणीपुरवठा योजना झाल्या तरी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही. सर्वाधिक किडनीच्या अाजाराचे रुग्ण ग्रामीण भागात आढळतात. ते अशुद्ध पाण्यामुळे आहे.

Advertisement

चीनच्या ‘त्या कर्तुत्वा’मुळे अमेरिकेला करावे लागले ‘तसेही’; पहा काय चालूये जागतिक राजकारणात

Advertisement

अर्र.. काळजी घ्या रे.. चीनने आणखी एकदा वाढवलीय डोकेदुखी; पहा काय संकट आलेय तिकडे

Advertisement
Advertisement

Leave a Reply