Take a fresh look at your lifestyle.

‘पेगॅसस’ हेरगिरीमध्ये मोदी सरकार नाही तर कोण? भाजप खासदार स्वामी यांनीच केलाय बडा सवाल..!

मुंबई : इस्त्राईलच्या ‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे भारतात अनेकांवर वॉच ठेवला जात असल्याच्या बातमीने सध्या राजकीय जोर पकडला आहे.  देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकत्यांचे फोन ‘हॅक’ करण्यात आल्याचा दावा ‘प्रोजेक्ट पेगॅसस’द्वारे माध्यमांनी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षाच्या रडारवर आहेत. अशावेळी आता भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीदेखील यात उडी घेतली आहे.

Advertisement

स्वामी यांनी ट्वीट करून आपल्या मनकी बात जगजाहीर करून टाकली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी असून कंत्राट दिल्यानुसार काम करते. कंपनीने तसेच स्पष्ट केले आहे. भारतातील ऑपरेशनसाठी त्यांना पैसे कोणी दिले हा महत्वाचा प्रश्न असून ‘तो’ नेमका कोण, याबद्दल भारतातील जनतेला सांगण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. जर भारत सरकार नाही तर मग कोण, असाच कळीचा मुद्दा स्वामी यांनी उपस्थित करून सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.

Advertisement

Advertisement

‘एनएसओ’ या इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या ‘पेगॅसस’ तंत्रज्ञानाआधारे जगातील कोणावरही लक्ष ठेवणे शक्य आहे. ‘द वायर’च्या लेखामधून सोमवारी उघड झालेल्या नावांमध्ये अनेक बडी मंडळी आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता त्यातून व्यक्त झालेली आहे.

Advertisement

‘पेगॅसस’ हे तंत्रज्ञान फक्त देशांच्या सरकारांना विकले जात असल्याने भारतात केंद्रातील सत्ताधारी सरकारच्या वतीने हेरगिरी केली गेल्याचाही संशय होत आहे. राहुल गांधी यांचे दोन फोन क्रमांक व त्यांच्या पाच मित्रांच्याही फोन क्रमांकाचा समावेश संभाव्य ३०० व्यक्तींच्या यादीत आहे.  ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखातील दाव्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसून भारताच्या लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी लोकसभेत केला आहे.

Advertisement

बाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे जगासाठीच घातक..!

Advertisement

व्हिडिओकॉन दिवाळखोरीत..! समूहातील 12 कंपन्यांबाबत घेतला मोठा निर्णय, आता गुतंवणूकदाराचे काय होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply