Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चक्क ‘हयात’ही झालेय बंद..! पहा कशामुळे बसलाय 5 स्टार हॉटेललाही झटका..!

मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा सर्व उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे. रिटेल सेक्टरमध्ये तब्बल 34 टक्के इतका मोठा झटका बसण्यास लॉकडाऊन जबाबदार ठरला आहे. अशावेळी मुंबईतील पंचतारांकित ‘हयात’ हॉटेल बंद पडल्यामुळे ‘आतिथ्य आणि पर्यटन उद्योग’ किती मोठा धोका आहे हे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल चेन एशियन हॉटेल्स (वेस्ट) ने मुंबईतील हयात रीजेंसी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांना पगार देण्यास पैसे नसल्याचे हॉटेलने 7 जून 2021 रोजी जारी केलेल्या नोटिशीद्वारे स्पष्ट केले. ज्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत हॉटेलच्या सर्व सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

Advertisement

हयात रीजेंसीमध्ये कार्यरत दीडशेहून अधिक कर्मचार्‍यांनी यामुळे एका झटक्यात नोकरी गमावली आहे. शिवसेनेच्या युनियन भारतीय कामगार सेनेने हॉटेलच्या या निर्णयाला औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले आहे. तथापि, एशियन हॉटेल्स (वेस्ट) या मूळ कंपनीच्या हयात साखळीपैकी केवळ मुंबई विमानतळाजवळ असलेली हयात रीजेंसी बंद करण्यात आली आहे. इतर सर्व हयात हॉटेल्स कार्यरत आहेत.

Advertisement

मीडिया रिपोर्टनुसार हॉटेलला कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. 2020-21 वर्षाच्या नऊ महिन्यांत हॉटेल समूहाला 109 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीने येस बँकेकडून घेतलेले 4.32 कोटींचे कर्ज आणि व्याज देता येणार नसल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply