Take a fresh look at your lifestyle.

आणि ‘ती’ बातमी डिलीट झाल्याने ट्विटरवर चर्चेला सुरुवात; पहा काय आहे प्रकरण

दिल्ली : सध्या पेगासस हॅकिंग प्रकरणामुळे जगभरात भारत सरकार ट्रेंडमध्ये आहे. अशावेळी राष्ट्रीय वृत्तपत्र असलेल्या दैनिक भास्कर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे गुजरातमध्ये मुख्यमंत्री व मंत्री असतानाच्या प्रकरणाची आठवण करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, ती बातमी अखेर ‘भास्कर’ समूहाने हटवली आहे. त्यामुळे ती आणखी जास्त चर्चेत आली आहे.

Advertisement

Advertisement

‘पहले गुजरात, अब केंद्र : टॅपिंग विवाद मोदी-शाह के लिये नया नही, १५ साल पहले भी गुजरात के नेता और अधिकारी के फोन टॅप करने के लगे थे आरोप’ अशा आशयाची बातमी भास्कर समूहाने प्रसिद्ध केली होती. मात्र, आता ही बातमी आणि बातमीचे ट्विट डिलीट केलेले आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

लखनौ येथील पत्रकार रणविजय सिंग यांनी याकडे लक्ष वेधताना म्हटले आहे की, मोदी-शहा यांच्या जुन्या फोन टॅपिंग प्रकरणावर दैनिक भास्करने काल एक बातमी केली होती. ही बातमी दैनिक भास्कर यांनी काढली आहे. अलीकडच्या काळात भास्कर यांच्या पत्रकारितेचे खूप कौतुक होत आहे. पण ही कथा हटवल्यानंतर भास्करही दडपणाखाली आल्यासारखे दिसते आहे.

Advertisement

एकूणच ही बातमी का दिसत नाही याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. मात्र, त्यावर वृत्तपत्राने अजूनही काहीही म्हटलेले नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply