Take a fresh look at your lifestyle.

मोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी काय घडलीय घटना

मुंबई : करोना लसीकरण प्रमाणपत्र असो की कोणताही सरकारी दस्तऐवज त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देण्याची भन्नाट योजना भारतीय प्रशासनाने राबवली आहे. त्याबद्दल वेळोवेळी टीका झाली आहे. मात्र, कोडगे प्रशासन आणि कशातही चमकोगिरी करण्याची संधी असावीच असा हट्ट असलेल्या राजकीय पक्षांना याचे काहीही सोयरसुतक नाही. मात्र, त्यामुळे जर्मनीत कसे भारत देशाचे हसू झाले याचा किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

Advertisement

पुणे येथील वकील आणि सामाजिक अभ्यासक असीम सरोदे यांनी याबाबतच्या अनुभवाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, लंडनच्या एअरपोर्ट वर पोहोचलेल्याआमच्या दीप्ती ताम्हाणे नावाच्या मैत्रिणीला वॅक्सिन सर्टिफिकेट मागण्यात आले. तिने सर्टिफिकेट दाखविले तेव्हा ते म्हणाले, अहो तुमचे सर्टिफिकेट द्या हे कुणाचे तरी दुसऱ्याचेच आहे. तिने जेव्हा सांगितले की हे माझेच आहे आणि हा फोटो आमच्या पंतप्रधानांचा आहे तेव्हा एअरपोर्ट वरील स्टाफ तो फोटो बघून खळखळून हसत होता. असे ओशाळवाने अनुभव किती जणांना आले असतील. भारतीय लोकांची शोभा करणारा व खजील करणारा अनुभव दीप्तीने लिहिला आहे तो जरूर वाचावा.

Advertisement

दीप्ती यांनी लिहिलेय की, लंडनला जाण्यासाठी फ्रँकफर्ट विमानतळावरील लुफ्तान्साच्या सर्व्हिस डेस्कवर आमच्याकडे वेगवेगळी कागदपत्रं मागितली गेली. त्यापैकी एक महत्वाचा कागद अर्थातच लसीकरण प्रमाणपत्र होते. काऊण्टरवरील महिलेला लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्यावर त्यांनी प्रमाणपत्रावरील तारीख आणि फोटो पाहिला. आणखी खात्रीसाठी लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो आणि पासपोर्टवरील फोटो सारखाच आहे का याची तपासणी करताना महिला अधिकारी रागावली. चुकीचे प्रमाणपत्र देऊन फसवणूक करतोय, असेच त्यांना वाटले. कारण पासपोर्ट आणि प्रमाणपत्र यावरील फोटो वेगवेगळे होते. मग हा फोटो आमच्या माननीय पंतप्रधानांचा असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची समजूत काढली. त्यांना ते पटले. मात्र, त्यानंतर ती मोठमोठ्याने हसू लागली आणि तिने ते प्रमाणपत्र तिच्या सहकाऱ्यांनाही दाखवले. सगळ्यांना या प्रमाणपत्राचा धक्का बसला आणि तेही हसू लागले. मात्र, अखेरीस आमचे प्रमाणपत्र स्वीकारले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply