Take a fresh look at your lifestyle.

प्रलंबित 5.79 कोटीचे अनुदान जमा होणार; 844 शेतकऱ्यांना मिळणार लाभ..!

अहमदनगर : सध्या पाण्याच्या टंचाई काळात शेततळे हे एक महत्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. मात्र, त्यासाठी मिळणारे सरकारी अनुदान दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांना स्वखर्चाने शेततळ्यांचे अस्तरीकरण करावे लागत आहे. अनेकांचे असे अनुदान प्रलंबित आहे. त्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातील 844 शेतकऱ्यांचे अनुदान लवकरच मिळणार आहे.

Advertisement

केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे अस्तरीकरण या बाबीचे अहमदनगर जिल्ह्यातील  844 शेतकऱ्यांना 5 कोटी एकूण 79 लाख प्रलंबित अनुदान सण 2019-20 या अर्थिक वर्षातील मंजूर झाले असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली.

Advertisement

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे मुख्य ध्येय हे, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोचविणे हे आहे. ज्या  पद्धतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजने योजना प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते  पोचल्याचे उद्दिष्ट ठेवले, त्याच पद्धतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेतात पर्यंत सिंचन पोहोचण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारनेठेवले आहे.

Advertisement

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 844 शेतक-याना शेततळ्याचे अस्तरीकरण साठी  प्रलंबित 5 कोटी 79 लाख रुपयाचे अनुदान जमा होणार असून त्यापैकी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील 519 शेतकऱ्यांना  प्रलंबित अनुदान जमा झाले आहे. नगर तालुका 29. 85 लाख, पारनेर तालुका 36.23 लाख, पाथर्डी तालुका 29.06 लाख, कर्जत तालुका 40.16 लाख, श्रीगोंदा तालुका 123. 63 लाख, जामखेड तालुका 20.09 लाख,  राहुरी तालुका 8  लाख, शेवगाव 78.10 लाख या तालुक्यातील शेतकरी यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदान मंजूर झाले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply