Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मारुती मंदिरात सुरू झालीय शाळा; पहा नेमके काय म्हटलेय हेरंब कुलकर्णींनी

अहमदनगर : शिक्षक आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील घडामोडी व घटना यांच्यावर ठोस आग्रही भूमिका घेणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांनी शाळा सध्या मंदिरात घेण्याचा एक पर्याय मांडला आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीने शाळा सुरू होत आहेत. त्यांनी त्याबद्दल भूमिका फेसबुकवर मांडली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटलेय की, पुन्हा एकदा मारुती मंदिरात शाळा. फार पूर्वी महाराष्ट्रात गावोगावी शाळा मारुती मंदिरात भरायच्या.. पण २०२१ मध्येही शाळा आज मारुती मंदिरात भरवावी लागली. कोरोनाने शाळा बंद व online शिक्षणातून विद्यार्थी शिकताना अडचणी येताहेत. तर काहींकडे मोबाईल नाहीत. त्यावर उपाय म्हणून आमच्या मॉडर्न हायस्कुल अकोले शाळेने हायस्कुलच्या परिसरात असलेल्या वस्ती वस्तीवर तेथील विद्यार्थी एकत्र करून offline वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळं मारुती मंदिर शेकईवाडी येथे असलेला हा वर्ग. इतर वस्तीवर मोकळ्या मैदानात विद्यार्थी बसतात. ४ वस्त्यांवर असे वर्ग सुरू झालेत. पालक इतर ठिकाणी मागणी करत आहेत. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक रोज जाऊन शिकवतात.

Advertisement

(10) Facebook

Advertisement

जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मागील वर्षीपासून खेड्यातील शाळांमध्ये शिकवत आहेत तर आश्रमशाळा शिक्षकांनी अनेक ठिकाणी स्वाध्यायपुस्तिका देऊन शिकवले आहे.पण हायस्कुल ला जास्त विद्यार्थी व जास्त इयत्ता असल्याने नियोजन करणे कठीण असते तरीही आमची शाळा जमवते आहे. अंतर ठेवून बसवणे, मास्क घातल्याची खात्री ,भरताना सुटताना काळजी असे करावे लागते. शाळा सुरु होईपर्यंत असेच छोटे छोटे गट तयार करून शिकवणे हाच मधला मार्ग आहे व सुदैवाने अनेक शिक्षकांनी अंमलबजावणी सुरू केलीय, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply