Take a fresh look at your lifestyle.

तरीही कुरापतखोर चीनच झालाय आत्मनिर्भर; मोदी सरकारच्या घोषणेचा परिणाम काही अजूनही दिसेना..!

मुंबई : केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर भारत योजनेचा मोठा गाजावाजा सुरू असतो. प्रत्यक्षात मात्र आत्मनिर्भरतेच्या बाबतीत देश अजूनही खूप मागे आहे, हे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. भारत आणि चीनमध्ये मागील दीड वर्षापासून तणाव वाढत असतानाही भारताने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कॉम्प्यूटर हार्डवेअरच्या अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही देशात तणाव सातत्याने वाढत आहे. चीनने कुरापती काढण्याचे आपले उद्योग अजूनही थांबवलेले नाहीत. तरीसुद्धा व्यापाराचा विचार केला तर आजही चीन हाच भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

या वर्षात एप्रिलमध्ये चीनमधून जवळपास 65.1 लाख डॉलर्सच्या विविध वस्तू आयात करण्यात आल्या. मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा आकडा दुपटीने जास्त आहे. लॉकडाऊन काळात व्यापार जवळपास बंदच होता. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्यानंतर निर्बंध कमी झाले तसा व्यापार आधी पेक्षा जास्त वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षात विविध प्रकारच्या इलेक्ट्ऱॉनिक वस्तू, कॉम्प्यूटर हार्डवेअर आणि दूरसंचार उपकरणांच्या आयातीत वाढ झाल्याचे दिसून आले. 2021 मध्ये चीनी आयातीची हिस्सेदारी 40.5 टक्के आहे. 2020 मध्ये 37.2 टक्के होती. 2019 मध्ये 36.9 टक्के होती. 2021 मध्ये एकूण निर्यातीत चीनचा वाटा 16.53 टक्के राहिला आहे. मागील 12 वर्षात सर्वाधिक आहे.

Advertisement

भारत प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, दूरसंचार उपकरण, कार्बनिक रसायन, कॉम्प्यूटर हार्डवेअर, डेअरीसाठी औद्योगिक उपकरणे, प प्लास्टिकसाठी आवश्यक कच्चा माल चीनकडून खरेदी केला जातो. काही दिवसांपासून दोन्ही देशात तणाव आहे. गलवानच्या घटनेनंतर तर भारतीयांत चीनबद्दल आधिकच राग आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. असे असतानाही कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीत मात्र वाढ झाली आहे. या वर्षातील एप्रिल महिन्यात भारतीय बाजारपेठेत चीन निर्मित वैक्यूम क्लिनर, रेफ्रिजरेटर, माइक्रोवेव्ह यांसारख्या वस्तू मागील वर्षातील एप्रिल महिन्यात जास्त दिसत होत्या.

Advertisement

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एकूण गरजेच्या तुलनेत 40.71 टक्के वस्तू चीनमधून मागवण्यात आल्या. मागील वर्षात हे प्रमाण 33.54 टक्के होते. 2019 मध्ये हे प्रमाण 33.82 टक्के होते. तर 2018 मध्ये 33.90 टक्के होते. 63 टक्के कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चीनकडून खरेदी करण्यात आल्या. मागील वर्षात जितके कॉम्प्यूटर हार्डवेअरची उपकरणे मागवण्यात आली त्यात एकट्या चीनकडून 55 टक्के उपकरणे खरेदी करण्यात आली. 2020-21 मध्ये देशात दूरसंचार उपकरणे आयात करण्यात आली त्यामध्ये सुद्धा 43.5 टक्के उपकरणे चीनमधून मागवली होती.

Advertisement

अशा पद्धतीने व्यापाराच्या बाबतीत चीनचा दबदबा निर्माण झाला आहे. अनेक गोष्टींसाठी जगातील अनेक देश अगदी अमेरिका सुद्धा चीनवरच अवलंबून आहेत. भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे दोन्ही देशात कितीही वाद होत असले, तणाव निर्माण होत असला तरी आजही या दोन्ही देशांतील व्यापार मात्र सुरळीत सुरू आहे.

Advertisement

म्हणून जागतिक बाजारात भाव उतरणार..! परंतु, मोदी सरकारवर आहे पेट्रोल दर घसरणीची खरी भिस्त..!

Advertisement

म्हणून अधिकारींनी सुनावालेय नेत्यांना; पहा कशामुळे झटका बसलाय मोदींच्या भाजपला..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply