Take a fresh look at your lifestyle.

बॅकपेनचा त्रास होतोय..? मग संगणकीय कामकाजादरम्यान ‘अशी’ घ्या की काळजी

कोरोना काळात अनेक बदल झाले आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. या पद्धतीने कामकाज होत असल्याने कंपन्यांचा खर्च कमी होऊन त्यांना फायदा होत असला तरी कर्मचाऱ्यांना मात्र अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. पाठदुखी, मानदुखी हा त्रास त्यातीलच एक. सतत एका जागी बसून काम केल्याने पाठदुखीचा त्रास होण्याची समस्या जणांना जाणवत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. या उपायांचा वापर केल्यास पाठदुखीतुन आराम मिळेल.

Advertisement

आपण जर कॉम्प्युटरवर काम करत असाल त तर सर्वात आधी कॉम्प्युटरचा मॉनिटर व्यवस्थित ठेवा. हा मॉनिटर शक्यतो एक फूट अंतरावर असला पाहिजे. जास्त वर असेल तर मानदुखी होण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. मॉनिटर आपल्या नजरेसमोर असावा त्यामुळे फार त्रास होणार नाही, डोळ्यांना सुद्धा जास्त त्रास होणार नाही.

Advertisement

एका जागी जास्त वेळ काम केल्याने पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होईल, त्यामुळे मध्ये थोडासा ब्रेक घेतला तर या त्रासापासून आराम मिळेल. थोडा वेळ घरात चालण्याचा व्यायाम करण्यास हरकत नाही.

Advertisement

आपण वर्क फ्रॉम करत आहात. त्यामुळे येथे काही ऑफिसचा लूक मिळणार नाही. त्यामुळे टेबल आणि खुर्ची यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने बसणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे. बराच वेळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम केल्याने पाठीच्या मणक्यांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य पद्धतीने बसणे जास्त महत्वाचे आहे. या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे.

Advertisement

या काही सोप्या पद्धतींचा वापर केल्यास आपणास पाठदुखीचा त्रास होणार नाही. कामकाजाच्या तणवातूनही सुटका मिळेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply