Take a fresh look at your lifestyle.

तयार रहा रे पावसासाठी.. पहा कोणत्या भागात होणार आहे मुसळधार, हवामान अंदाज जारी

मुंबई : याआधी हवामान विभागाने आज राज्यातील रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता. या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचे विभागाने सांगितले होते. 20, 21 आणि 22 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 20 जुलै रोजी अमरावती आणि नागपूर, 21 जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली, 22 जुलै रोजी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Advertisement

सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर अचानक गायब झालेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आता हवामान विभागाने पुन्हा पावसाबाबत सुधारीत अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

कोकण, गोवा, घाटमाथ परिसर, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी परिसरात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती आणखी तीन ते चार दिवस कायम राहू शकते. तसेच 23 जुलैपर्यंत उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कायम राहू शकते, असा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या देशभरात अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या राज्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, हरियाणा, चंडीगढ आणि राजधानी दिल्ली येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.