Take a fresh look at your lifestyle.

‘महाविकास’ला आव्हान देणार वंचित; पहा झेडपी-महापालिका निवडणुकीसाठी काय चालू आहे मोर्चेबांधणी

अहमदनगर : आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा अशा सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने स्वबळावर लढणार, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली.

Advertisement

वंचित बहुजन आघाडीच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात प्रा. किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, ज्येष्ठ सल्लागार प्रा. जीवन पारधे, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, बन्नो भाई शेख, संतोष गलांडे, योगेश सदाफुले, सचिव चंद्रकांत नेटके, संघटक फिरोज पठाण, सुरेश खंडागळे, चंद्रकांत डोलारे, अनंता पवार, संतोष जठार, अमर निरभवणे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्‍यारेलाल भाई शेख, सलीम शेख, कर्जत तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रा. किसन चव्हाण पुढे म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून तिसरा पर्याय निर्माण झाला आहे. आणि आपल्याला ध्येय गाठण्यासाठी शिस्त, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी प्रत्येक गावातील दलित, मुस्लिम, इतर मागासवर्गीय, छोट्या जाती, गरीब मराठा, बौद्ध, बाराबलुतेदार अशा विविध समूहातील किमान दहा कार्यकर्ते सोबत घेऊन कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.

Advertisement

अॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले, वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर वंचितांचे छोटे-मोठे प्रश्न घेऊन सतत काम केले पाहिजे. स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे. अभ्यास, चिंतन, विचार, चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजेत. काही नव्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले पाहिजे.

Advertisement

जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की, आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी हाती घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. अहमदनगर महानगरपालिकेत किमान २० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या बैठकीस प्रारंभ झाला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष दादासाहेब साठे, श्रीरामपूर चे डॉ. सुधीर क्षीरसागर, दिपक कदम, तसेच श्रीमती शोभा ताई साठे  यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्रा. किसन चव्हाण यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Advertisement

यावेळी संतोष गलांडे, संतोष जठार, चंद्रकांत डोलारे, अरविंद सोनटक्के, चंद्रकांत नेटके, फिरोज पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी प्रास्ताविक केले. योगेश साठी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जीवन पारधे यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply