Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीची झळाळी उतरली..! आता ‘मिस्ड काॅल’वर मिळणार दराबाबत माहिती, कशी ती तुम्हीच पाहा..?

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. चांदीचे भावही गडगडले. त्यामुळे सध्याचा काळ सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

सोन्याच्या दराचा रेकॉर्ड या वर्षाअखेर तुटून 60 हजार रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. अशा वेळी गुंतवणुकदार मालामाल होऊ शकतात. गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला होता. त्यामुळे दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी सध्या सोनेखरेदीसाठी उत्तम वेळ असल्याचे सागंण्यात येते.

Advertisement

‘एमसीएक्स’वर आज सोने 48,076 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या दरात 0.4 टक्के म्हणजे 274 रुपयांची घट होऊन 68045 रुपये प्रति किलोवर गेले होते.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने प्रति औंस 1,814.70 डॉलरच्या पातळीवर होते. चांदी सध्या 0.81 टक्क्यांनी घसरुन प्रति औंस 25.587 डॉलरवर व्यापार करीत असल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

‘मिस्ड काॅल’वर दराबाबत माहिती
दरम्यान, आता तुम्हाला घरबसल्या साेन्याच्या दराची माहिती मिळणार आहे. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर काही वेळात मोबाइलवर दराबाबत माहिती मिळेल. सोन्याच्या किंमतीची लेटेस्ट अपडेट्स http://www.ibja.com या वेबसाइटवर मिळू शकेल.

Advertisement

अर्र.. ‘तिथे’ डाळिंब झालेय मातीमोल; मिळालाय किलोला फ़क़्त अडीच रुपये भाव
बातमी आरक्षणाची : राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका

Advertisement
Advertisement

Leave a Reply