Take a fresh look at your lifestyle.

गुंतवणुकदार कंगाल..! शेअर बाजार गडगडला.. भांडवली बाजाराची आजची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, इंधनांच्या वाढलेल्या किमतीसह विविध मुद्द्यांवरून संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

Advertisement

अधिवेशनावर लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी बाजार उघडताच शेअर्सची जोरदार विक्री सुरू केली. यामुळे सेन्सेक्समध्ये जवळपास ६०० अंकांची मोठी घसरण झाली, निफ्टीत १८७ अंकांची घट झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास एक लाख कोटींचा फटका बसलाय.

Advertisement

बँका, आयटी शेअर, मेटल, ऑटो क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्री केली. सुरवातीला सेन्सेक्स ६३३ अंकांच्या घसरणीसह ५२५०६ अंकावर खुला झाला होता, तर निफ्टीने १८७ अंकांच्या घसरणीसह १५७३५ अंकावर आजच्या दिवसाची सुरुवात केली.

Advertisement

निफ्टीमध्ये एनटीपीसी, एचसीएल टेक, टायटन, बीपीसीएल , नेस्ले या निवडक शेअरमध्ये वाढ झाली, तर दुसऱ्या बाजूला एचडीएफसी बँकेचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला. नुकताच बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला होता, मात्र आज त्यात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याचे दिसून आले. बँकिंग क्षेत्रात इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी शेअरमध्ये घसरण झाली.

Advertisement

दरम्यान, काही देशांमध्ये करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने दहशत माजवली आहे. ही साथ पसरली तर धोका वाढेल, या भीतीने संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केलीय. त्याचाही फटका बसल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

Advertisement

सोन्या-चांदीची झळाळी उतरली..! आता मिस्ड काॅलवर मिळणार दराबाबत माहिती, कशी ती तुम्हीच पाहा..?
तर भारत देश होईल आत्मनिर्भर; गरिबी हटावबाबत राज्यपालांनी म्हटलेय ‘असे’

Advertisement
Advertisement

Leave a Reply