Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मोदी सरकारचे अभिनंदन जोरात; पहा नेमकी काय ‘कामगिरी’ केलीय त्यांनी

मुंबई : देशात कोरोना संकटाच्या पाठोपाठ महागाईचे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तर रोजच वाढत चालले आहेत. या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत सुद्धा वाढ झाली आहे. खाद्यतेलांचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यानंतर नागरिकांना आणखी झटका बसला आहे. 1 जुलैपासून घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 25.5 रुपये वाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने गॅस टाकीचे दर वाढणार असल्याचा अंदाज होताच. त्यानुसार तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. या दरवाढीमुळे आधीच वाढत असलेल्या महागाईत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement

देशात सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. आजपासून राजधानी दिल्लीत पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आधिवेशना दरम्यान विरोधकांकडून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर संसदेत केंद्र सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘महागाईच्या वणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत. पण काही का असेना, यामुळे केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर खोचक टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, लसीकरण धोरण यांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने देशभरात आंदोलन केले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. महागाई कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आंदोलनाचा मार्ग स्वीकारत केंद्र सरकारच्या कारभारा विरोधात राज्यात दोन दिवस आंदोलन केले होते.

Advertisement

पेट्रोल-डिझेलने सामान्यांचा खिसा खाली; तर सरकारची बक्कळ कमाई, पहा कोणी, किती कमावले..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply