Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानमध्ये आलेय ‘ते’ भयंकर संकट; पहा काय परिस्थिती झालीय सामान्य जनतेची

मुंबई : पाकिस्तानात आज अन्न धान्य आणि पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. भारता बरोबर व्यापार बंद असल्याने देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, देशाच्या राज्यकर्त्यांना त्याची काळजी नाही. तर दुसरीकडे देशात आज 40 टक्के मुले कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत, हे सुद्धा त्यांनी मान्य केले आहे.

Advertisement

डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने मागील वर्षात 40 दशलक्ष टन गहू आयात केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात गहू आयात केल्याने त्याचा परिणाम देशाच्या परकीय चलसाठ्यावर झाला. आज देशासमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. सकस आहाराअभावी देशातील 40 टक्के मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत नाही, असे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते.

Advertisement

भारतात इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. कोरोना संकटाच्या काळातसुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत. अशावेळी भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तानातसुद्धा असेच संकट आले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक संकट वाढत चालले आहे. या संकटकाळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी येथील सरकारने नागरिकांना त्रास देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तेथे समाजात मोठ्या प्तामानात आक्रोश आहे.

Advertisement

आता सुद्धा इम्रान सरकारने पेट्रोल आणि हाई स्पीड डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 5.40 रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या दरात 2.54 रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता पाकिस्तानमध्ये पेट्रोल 118.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 116.5 रुपये प्रति लिटर असे झाले आहेत. त्यानंतर आता इम्रान सरकारने खाद्य पदार्थांचे भाववाढ करण्याचाही निर्णय घेतला आहे.

Advertisement

द न्यूज इंटरनॅशनलच्या एका रिपोर्टनुसार, कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीने साखर, गहू आणि तुपाच्या दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने हैराण झालेल्या पाकिस्तानी नागरिकांना आता आणखी झटका बसणार आहे. या निर्णयामुळे आता देशात साखर 85 रुपये किलो, तूप 260 रुपये प्रति किलो आणि गहू 950 रुपये प्रति बॅग असे नवे दर आहेत.

Advertisement

पाकिस्तानची करामत : पोखरणवर लक्ष ठेवण्यासाठी ISI चा असाही प्लान; अटकेनंतर झाला भांडाफोड..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply