Take a fresh look at your lifestyle.

म्हणून जागतिक बाजारात भाव उतरणार..! परंतु, मोदी सरकारवर आहे पेट्रोल दर घसरणीची खरी भिस्त..!

मुंबई : सध्या भारतात केंद्र सरकारने जीएसटी आणि विविध करांच्या संकलनाच्या नावाखाली सामान्य जनतेचे जगणे हराम केले आहे. तुघलकी थाटात कराचे संकलन करूनही आरोग्य आणि इतर सुविधा मिळण्याची देशभरात वाणवा कायम आहे. अशावेळी जगभरात इंधन दरवाढीतून सामान्य जनतेला किमान काहीअंशी दिलासा मिळावा या हेतूने ओपेक संघटनेने पुढाकार घेतला आहे. मात्र, जगभरात भाव कमी झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कितपत दिलासा देणार यावरच भारतीयांची भिस्त असणार आहे.

Advertisement

सध्या जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. भारतात तर अनेक राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलसुद्धा त्याच मार्गावर आहे. या दरवाढीने देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, तरी सुध्दा या किमती कमी करण्याचा विचार सरकारने केलेला नाही. इंधन दरवाढीने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. कारण, ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने ऑगस्टपासून तेलाच्या पुरवठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक देश दरमहा 4 लाख ब्यारल तेल उत्पादनात वाढ करतील असा निर्णय या देशांच्या बैठकीत घेण्यात आला.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ओपेक देशांना संपर्क साधत इंधन आणि कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात राहतील या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रविवारी ओपेक देशांच्या बैठकीत तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तेल उत्पादनात वाढ होऊन पुरवठा सुद्धा वाढणार आहे, त्यामुळे कदाचित इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

कोरोना संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थाना मागणी वाढली आहे. तेलाचे उत्पादन मात्र मर्यादित असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या आठवड्यात कच्चे तेल साधारण 73.14 प्रति ब्यारल या दराने विक्री केले जात होते. तेलाची मागणी वाढत असल्याने आता उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशात इंधनाच्या किमती कमी होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तेलाची वाढती मागणी पाहता असे होण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे. दर महिन्यास चार लाख ब्यारल तेल जास्त तयार होणार असले तरी त्या काळात मागणी आणखी वाढेल, त्यामुळे किमती कमी होतील, हे आताच सांगता येणे कठीण आहे.

Advertisement

म्हणून मोदी सरकारचे अभिनंदन जोरात; पहा नेमकी काय ‘कामगिरी’ केलीय त्यांनी

Advertisement

वाव.. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीला मिळाला तगडा उमेदवार; लंकेंनी सांगितलाय दक्षिणेवर हक्क..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.