Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांना’ राष्ट्रवादीमध्ये मिळतो न्याय; पहा नेमके काय सूचित केलेय रोहित पवारांनी

अहमदनगर : ‘राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष करतो, त्याला न्याय मिळतो’ असे सांगतानाच भाजपकडून ओबीसी नेतृत्वाला डावलले जात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Advertisement

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्याकडे निर्देश करून रोहित पवार म्हणाले की, ज्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी केली, परिश्रम करून सत्ता आणली, अशा नेत्यांवर भाजपमध्ये फक्त अन्याय होतो.

Advertisement

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, माजी सभापती संभाजी पालवे, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, जिल्हा संघटनेतील बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, बाळासाहेब ताठे, चांद मनियार, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश ढाकणे, सूत्रसंचालन विणा दिघे, उद्धव काळापहाड यांनी केले. सिद्धेश ढाकणे, योगेश रासने, देवा पवार, वैभव दहिफळे, अक्रम आतार, विनय बोरुडे यांनी सहकार्य केले.

Advertisement

ॲड. प्रताप ढाकणे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांबरोबर बोलून सत्तेत सहभागी करून घेण्याचा शब्द यावेळी रोहित पवार यांनी दिला. तर, ढाकणे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर आपण भाजपमध्ये गेल्याचे सांगताना स्वाभिमान व विचारांशी तडजोड करण्याचा तेथे प्रश्न येताच सत्तेला बाजूला ठेवत आपण पक्ष सोडण्याची आठवण करून देताना आमच्या भगिनी पंकजा मुंडे यांची काय अवस्था झाली, खडसेंचे काय केले यावरही आपले मत या कार्यक्रमात व्यक्त केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.