Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. काळजी घ्या रे.. चीनने आणखी एकदा वाढवलीय डोकेदुखी; पहा काय संकट आलेय तिकडे

मुंबई : करोना संकटात जगाला टाकून लाखो लोकांचा जीव घेणारा करोना नावाचा विषाणू चीन देशातून जगभरात फैलावला होता. त्यानंतर याच देशात पहिला बर्ड फ्ल्यू रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. आता आणखी तिसरा विषाणू याच देशात आढळला आहे. त्यामुळे जगाच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सुद्धा देशात माकडांद्वारे संक्रमण फैलावत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, जग ओरडून सांगत असतानाही कोरोना आपल्याच देशातून फैलावल्याचे साफ नाकारणाऱ्या चीनने मात्र हा नवा विषाणू फैलावत असल्याचे मान्य केले आहे. या विषाणूस ‘मंकी बी व्हायरस’ असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू माकडांद्वारे आल्याचे सांगण्यात येत आहे. या विषाणूने संक्रमित लोकांमध्ये मृत्युदर 70 ते 80 टक्के आहे.

Advertisement

कोरोना काळात हा नवा विषाणू आल्याने चीनमध्ये खळबळ उडाली आहे. बीजिंग शहरातील एक पशु अधिकारी मंकी बी व्हायरसने संक्रमित असल्याचे आढळून आले होते. या अधिकाऱ्याचा नंतर मृत्यू झाला. याआधी चीनमध्ये या विषाणूने संक्रमित प्रकरणांबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यासच मंकी बी व्हायरसने संक्रमित पहिला रुग्ण मानण्यात येत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची तपासणी केली असता त्यांचे तपासणी अहवाल मात्र निगेटीव्ह आले आहेत.

Advertisement

या आधी अमेरिकेत काही दिवसांपूर्वी मंकी पॉक्स या आजाराचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता चीनमध्ये मंकी बी हा नवा व्हायरस दाखल झाला आहे. याआधी चीनमध्येच बर्ड फ्लू चा ही एक रुग्ण आढळला होता. या व्हायरसचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, ज्यावेळी करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर चीन घेरला गेला आहे. करोना विषाणू चीनच्याच वुहान प्रयोगशाळेतून जगात पसरल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जगभरातून होत आहे. अमेरिकेसह काही पश्चिमी देश, युरोपीय देश आक्रमक पवित्र्यात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेस आता आधिक चौकशी करण्याची गरज वाटत आहे. या घडामोडींमुळे चीनवर दबाव वाढत चालला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply